Heart Attack: केके, पुनीत, राजू श्रीवास्तव अन् आता सोनालींनाही हृदयविकाराचा झटका, या 7 गोष्टी लक्षात ठेवा

गायक केके, अभिनेता पुनित, कॉमेडियन राजू श्रीवास्तव आणि आता सोनाली फोगट हे सगळे लोकप्रिय आणि प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहेत ज्यांना हार्ट अटॅक आला आहे.
Sonali Phogat Heart Attack
Sonali Phogat Heart AttackDainik Gomantak

Sonali Phogat Heart Attack: बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे वयाच्या 42 व्या वर्षी गोव्यात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गायक केके, अभिनेता पुनित, कॉमेडियन राजू श्रीवास्तव आणि आता सोनाली फोगट हे सगळे लोकप्रिय आणि प्रसिद्ध व्यक्तीमत्व आहेत. (Heart Attack Symptoms)

या सगळ्यांची प्रकृती गंभीर आहे किंवा बहुतेकांच्या मृत्यूचे कारण म्हणजे हार्ट अटॅक आहे. गेल्या काही वर्षांत लहान वयातच लोकांना हृदयविकाराचा झटका अल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही खबरदारी घेतल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे. यासाठी तुम्हाला हृदयविकाराची काही लक्षणे माहित असणे आवश्यक आहे.

Sonali Phogat Heart Attack
तेलकट पदार्थामुळे वाढू शकते हार्ट ब्लॉकेजची समस्या

हार्ट अटॅक म्हणजे काय?

अनेकदा असे दिसून येते की लोक छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात, हे हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण असू शकते. त्यामुळे निष्काळजी होऊ नका. जर तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्याची यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे

छातीत तीव्र वेदना

श्वास लागणे

मळमळ वाटणे

थकल्यासारखे वाटणे

डाव्या हातामध्ये सतत दुखणे

सतत घाम येणे

चिंताग्रस्त वाटणे

पौष्टिक आहाराचं सेवन करा

हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या टाळण्यासाठी, आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जेवणात कमीत कमी तेल, तूप आणि मैदा वापरला तर बरे होईल. शक्य असल्यास, आपला आहार बदला आणि आरोग्यदायी अन्नाला प्राधान्य द्या. उदाहरणार्थ, आपल्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वे समाविष्ट करा. धूम्रपान आणि दारूचे सेवन करू नका. तुमची जीवनशैली सुधारा आणि ताण घेऊ नका.

Sonali Phogat Heart Attack
Sonali Phogat: भाजप नेता सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन

या गोष्टी लक्षात ठेवा

वयाच्या 30 व्या वर्षी तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि नेहमी डॉक्टरांकडून तुमची नियमित तपासणी करा.

व्यायामशाळेत व्यायाम करताना कधीही वेग वाढवू नका. तुमच्या क्षमतेनुसार व्यायाम करा.

तुमच्या क्षमतेनुसार जिममध्ये ट्रेडमिलचा वापर करा, जर कुटुंबातील एखाद्याला आधीच हृदयविकाराचा त्रास असेल तर वयाच्या 30 वर्षानंतर सप्लिमेंट्स आणि प्रोटीन पावडर सेवनातील घटक तपासून

रक्त, शुगर तपासणी आणि ईसीजी करून घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com