Urinary Tract Infection: युरिन इन्फेक्शन आरोग्यासाठी ठरु शकते हानिकारक, वेळीच घ्या काळजी

युरिन इन्फेक्शनवर उपचार न केल्यास किडनी खराब होण्याचा धोका वाढतो.
Urinary Tract Infection
Urinary Tract InfectionDainik Gomantak
Published on
Updated on

शरीरात कोणत्याही प्रकारचे संक्रमण असणे कोणत्याही परिस्थितीत चांगले नाही. यकृत, मूत्रपिंड किंवा शरीराच्या कोणत्याही भागामध्ये संसर्ग झाल्यास रुग्णाची प्रकृती गंभीर होते. युरिन इन्फेक्शनचा शरीराशी तसाच संबंध असतो. हा संसर्ग पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होतो, परंतु स्त्रियांमध्ये (Women) याची शक्यता जास्त असते. युरीनच्या संसर्गामुळे कधीकधी गंभीर समस्या उद्भवतात. लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब सतर्क राहण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

  • महिलांमध्ये युरिन इन्फेक्शन का जास्त असते

पुरुषांना महिलांच्या तुलनेत इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी असते. यामागील कारण म्हणजे स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग लहान आणि गुदाशयाच्या जवळ असतो. यामुळे, शरीरात प्रवेश करणारे जीवाणू सहजपणे मूत्रमार्गात प्रवेश करतात. पुरुषांमध्ये अंतर्गत मूत्रसंसर्ग होण्याचा धोका खूप कमी असतो. 


डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर एखाद्या महिलेला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) झाला असेल तर ती या आजाराला सहज बळी पडू शकते. लैंगिक संपर्कात येताना सावधगिरी बाळगली पाहिजे. योनीच्या आत राहणाऱ्या बॅक्टेरियामध्ये बदल झाल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो. रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये बॅक्टेरियामध्ये बदल झाल्याचे दिसून येते. गरोदरपणात, वय कमी-जास्त झाल्यावर आणि स्वच्छतेच्या अभावामुळे हा संसर्ग होतो. 


अंतर्गत भागात खाज वाढत असल्यास या लक्षणांवरून ओळखा . लघवी करताना वेदना किंवा जळजळ होते. सर्व वेळ लघवी गेल्याची भावना, लघवीत रक्त येणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे ही लक्षणे आहेत. युरिन इन्फेक्शन दीर्घकाळ राहिल्यास ते हळूहळू आतमध्ये वाढते आणि किडनी इन्फेक्शनची शक्यता वाढते. 

  • संसर्ग टाळण्यासाठी काय करावे
    स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. जर तुम्ही रोज आंघोळ करत नसाल तर आंघोळीची सवय लावा. लैंगिक संपर्क झाल्यास लघवीला जावे. अंतर्गत भागात अशी कोणतीही पावडर, साबण किंवा स्प्रे अजिबात वापरू नका. सार्वजनिक शौचालयात जाणे टाळा. कोणतीही समस्या असल्यास, त्वरित डॉक्टरांना भेटा. त्यानुसार औषधे घ्यावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com