Health Tips on Cold: साधा सर्दी-खोकलाही ठरू शकतो जीवघेणा; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

साधा सर्दी-खोकला देखील आरोग्यासाठी घातक ठरू शकतो अशी माहिती एका अभ्यात समोर आली आहे.
Healthy Tips For Cold and Cough
Healthy Tips For Cold and CoughDainik Gomantak

Healthy Tips For Cold and Cough: वातावरण बदलले की अनेक लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. पण आपण सर्दी-खोकला सामान्य आजार म्हणून लक्ष देत नाही.

पण तुम्हाला माहिती आहे का हा सामान्य वाटणारा आजार ब्लड क्लोटिंगसारख्या गंभार आजाराचे लक्षण असू शकतो. यामुळे प्लेटलेट्सवर देखील परिणाम होऊ शकतो.

याबाबत न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या नव्या अभ्यासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार या व्हायरसमुळे सर्दी, खोकला सारखी लक्षणे दिसू शकतात. ज्यामुळे नंतर जीवघेणा अँटी प्लेटलेट्स फॅक्टर 4 आजार होऊ शकतो.

  • अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती

पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, मेडिकल जर्नल युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसिनच्या अभ्यासाचा पुरावा देत असे लिहिले आहे की, वेळेवर आणि योग्य उपचार केल्यास या आजारापासून बचाव होऊ शकतो.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार प्लेटलेट्सशी संबंधित आजार व्हायरसमुळे होऊ शकतात.यामध्ये प्लेटलेट्स कमी होऊ शकतात.

तसेच या अभ्यासामध्ये कोणत्या लोकांना या आजाराचा धोका अधिक आहे याचा तपास करण्यात येत आहे.

cold
coldDainik Gomantak
Healthy Tips For Cold and Cough
Ginger Benefits: रिकाम्या पोटी आलं खाल्यास मासिक पाळीतील वेदना होतील दूर
  • या अभ्याची सुरूवात कशी झाली?

हा अभ्यासाची सुरूवात एका मुलापासून झाली. तो मेंदूमध्ये ब्लड क्लोटिंग आणि थ्रोम्बोसाइटोपेनिया (Severe Thrombocytopenia) आजाराला सामोरे जात होता.

या पूर्वी तो मूलगा सौम्य सर्दी-खोकला सारखा असलेल्या अॅडेनो व्हायरसवर उपचार घेत होता.

यामुळे सर्दी आणि खोकला झाल्यास दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू करावे. सामान्य वाटणारा सर्दी-खोकला देखील अनेक जीवघेण्या आजाराचे कारण ठरू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com