Laptop: अनेक लोक लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करतात. जे लोक घरून काम करतात ते शक्यतोवर लॅपटॉप मांडीवर ठेऊन काम करतात. पण तुम्हाला माहिती आहे का असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे तुम्हाला अनेक आजार देखील होऊ शकतात. यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया लॅपटॉप कसा वापरवा.
लॅपटॉप मांडीवर ठेवणे का घातक ?
जर तुम्ही लॅपटॉप मांडीवर ठेऊन बराचवेळ काम करत असाल तर यामुळे आपल्या मणक्याचा त्रास होऊ शकतो. तसेच याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. काही रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की यामुळे टोस्टेड स्किन सिंड्रोम देखील होऊ शकतो. याशिवाय शरीराची रचना किंवा बसण्याची पद्धत देखील बिघडते. यामुळे लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करणे टाळावे.
लॅपटॉपमधुन निघणारे रेडिएशन आरोग्यासाठी घातक
जेव्हा लॅपटॉप वापरतो तेव्हा त्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडतात. लॅपटॉपमधून निघणारे रेडिएशन वाय-फाय आणि ब्लूटूथपेक्षा कमी असतात. पण जेव्हा तुम्ही लॅपटॉप तुमच्या मांडीवर ठेवता तेव्हा हे रेडिएशन शरीराच्या थेट संपर्कात येते. यामुळे तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते.
लॅपटॉपर काम करताना कोणती काळजी घ्यावी
लॅपटॉप नेहमी अपडेट ठेवावा. लॅपटॉपचे सर्व प्रोग्राम्स, ऑपरेटिंग सिस्टीम आणि व्हायरस सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेट ठेवणे गरजेचे आहे.
लॅपटॉप खूप पोर्टेबल असतात, त्यामुळे लॅपटॉपची स्क्रीन तुम्हाला हवी तितकी मोठी आहे याची खात्री करून घ्यावी लागेल. यासह, स्क्रीनवर मजकूर आणि इतर गोष्टी पाहण्यासाठी तुम्हाला डोळ्यांना जास्त ताण द्यावा लागणार नाही.
लॅपटॉप वापरताना वायरलेस माऊस आणि कीबोर्डचा वापर केल्यास लॅपटॉप वापरणे सोयास्कर होते.
लॅपटॉप नेहमी सपाट पृष्ठभागावर ठेवावा. लॅफटॉप चुकूनही बेड किंवा उशीजवळ ठेऊ नका. तो लवकर गरम होतो. यामुळे खराब होण्याची जास्त शक्यता असते.
लॅपटॉप नेहमी स्वच्छ ठेवावा. लॅपटॉप वेळोवेळी स्वच्छ केल्याने जास्त दिवस चांगला राहतो.
घरून काम करत असाल तर लॅपटॉप नेहमी टेबल ठेवावा आणि खुर्चीवर ताठ बसुण काम करावे. यामुळे कोणतेही शारिरिक दुखणे वाढणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.