वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. पण झपाट्याने वजन वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे व्यायाम न करणे, अयोग्य आहार, आणि चुकीची जीवनशैली मानली जाते. पण व्यायाम आणि सकस आहारानंतरही वजन वाढत असेल, तर त्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. काही लोक खूप व्यायाम करतात आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींची देखील काळजी घेतात, तरीही वजन कमी होत नाही.
तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ज्याप्रमाणे वजन कमी होणे हे शरीरातील काही आजाराचे लक्षण मानले जाते. त्याचप्रमाणे वजन वाढणे हे देखील काही आजाराचे लक्षण असू शकते. लठ्ठपणा झपाट्याने वाढत असल्यास पुढील वैद्यकिय चाचणी करायला पाहिजे.
पीसीओएस
किशोरवयीन महिलांमध्ये झपाट्याने वजन वाढण्याचे कारण पीसीओएस देखील असू शकते. वाईट जीवनशैलीमुळे मुली आणि महिलांना हा त्रास होऊ लागला आहे. आजकाल पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम अगदी लहान मुलींमध्येही होऊ लागला आहे. पीसीओएस असलेल्या लोकांमध्ये वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे लठ्ठपणा वाढल्यास पीसीओएसची चाचणी नक्कीच करा.
लिपिड प्रोफाइल टेस्ट
जर तुमचे वजन वेगाने वाढत असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. यासाठी तुम्ही लिपिड प्रोफाइल टेस्ट करून घेऊ शकता. लिपिड प्रोफाइल चाचणी शरीरातील ट्रायग्लिसराइड आणि खराब कोलेस्ट्रॉल तपासते. ही एक महत्त्वाची चाचणी आहे. तुमचा लठ्ठपणा वाढल्यास हे नक्की चेक करावे.
ब्लड शुगर
मधुमेह असलेल्या लोकांचे वजन झपाट्याने वाढते. ब्लड शुगर वाढल्याने लठ्ठपणाही वाढतो. लठ्ठ लोकांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे तुमचे वजन सामान्यपेक्षा जास्त असल्यास तुमच्या ब्लड शुगर लेवर चेक करावे. यावरून कळेल तुम्हाला मधुमेह आहे की नाही?
थायरॉईड फंक्शन टेस्ट
जर वजन वेगाने वाढत असेल किंवा कमी होत असेल तर त्याचे एक कारण थायरॉईडची समस्या असू शकते. थायरॉईड झाल्यास लोकांचे वजन वाढू लागते. महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. थायरॉईड हे 40 नंतर महिलांचे वजन वाढण्याचे कारण असू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.