Healthy Food Tips: हिवाळ्यात पराठे खाण्याची मज्जाच वेगळी असते. हिवाळ्यात पराठे खायला सर्वांनाच आवडते. त्यात वेगळीच मजा आणि चव असते. थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीराला पुरेशी ऊर्जा आवश्यक असल्याने पराठे खाणे फायदेशीर असते.
बटाटे, कांदे, चीज, पालक, मुळा आणि इतर गोष्टींपासून पराठे बनवले जातात. अनेक लोकांना दह्यासोबत पराठा खायला आवडतो. पण तज्ज्ञांमध्ये पराठ्यांसोबत दही खाणे टाळावे. कारण यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतो.
पराठ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट मुबलक प्रमाणात असतात. तसेच दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्यास पचनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे असे खाणे टाळावे. अन्यथा तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
तज्ञांच्या मते पराठा आणि दही दोन्ही पचायला जड असतात. यामुळे नीट पचत नाहीत किंवा पचायला खूप वेळ लागतो.
जेव्हा दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केले जाते तेव्हा पचनक्रिया मंद होते. यामुळे अपचन, गॅस, पोट फुगणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.
पराठा आणि दही दोन्ही आम्लयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही पदार्थांचे सेवन एकत्र केल्यास त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. दह्यासोबत पराठे खाल्ल्याने मुरुम येतात. यामुळे दह्यासोबत दही खाणे टाळावे.
पराठा आणि दही या दोन्हीमध्ये भरपूर कॅलरीज असतात. हे दोन्ही एकत्र खाल्ले की वजन झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे तुमचा फिटनेस चांगला ठेवायचा असेल आणि वजन वाढवायचे नसेल तर दही आणि पराठे एकत्र खाऊ नका.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.