Healthy Tips: पावसाळ्यात चुकुनही खावू नका 'या' गोष्टी

पावसाळ्यात (Monsoon) योग्य तो आहार (Diet) घेणे आरोग्यासाठी (Health) फायद्याचे ठरते.
Avoid eating these foods in the rainy season
Avoid eating these foods in the rainy seasonDainik Gomantak
Published on
Updated on

Healthy Tips : संपूर्ण देशात मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. यामुळे आरोग्याकडे (Health) लक्ष देणे गरजेचे आहे . आपण आहारात (Diet) कोणत्या पदार्थांचा समावेश करतो याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तुम्ही घरात तुमच्या वडीलधाऱ्या माणसांकडून बऱ्याच वेळा एकले असेल की अशा वातावरणात काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे. बॅक्टेरियाने (Bacteria) संक्रमित पदार्थ (Food) खाल्यास विषबाधा होऊ शकते , सूज येऊ शकते , अतिसार, उलट्या आशा प्रकारचे आजार होऊ शकतात. तसेच्या तुमच्या प्रतिकारशक्तीवारी (Immunity) देखील परिणाम होऊ शकतो. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात कोणते पदार्थ खाणे टाळावे याबद्दल जाणून घेऊया.

Avoid eating these foods in the rainy season
Health Tips - अर्धा तास पायी चालण्याचे "हे" आहेत फायदे

* मशरूम

पावसाळ्याच्या दिवसात मशरूम खाणे टाळावे. या दिवसात मशरूमवर कीटक आणि जिवाणू लवकर वाढतात. जरी मशरूमवरील जिवाणू आपल्याला दिसत नसतील. परंतु ते पोटाच्या आजार निर्माण करू शकते. यामुळेच पावसाळ्यात मशरूम खाणे शक्यतोवर टाळावे.

* आंबट पदार्थ टाळावे

पावसाळ्यात योग्य तो आहार घेणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. यामुळेच पावसाळ्यात आंबट पदार्थ खाणे टाळले पाहिजे. असे पदार्थ खाल्ल्याने शरीराला अनेक आजारांना तोंड द्यावे लागेल. यात लोणची, चटणी, आंबट कॅडी आणि चिंच यासारखे आंबट पदार्थ पावसाळ्याच्या दिवसात खाणे टाळावे.

Avoid eating these foods in the rainy season
Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार

* रस्त्यावरील ज्यूस

ज्यूस प्यायलल्याने नक्कीच गरम वातावरणात आपल्याला आराम मिळत असेल. परंतु पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावरील ज्यूस पिणे टाळावे. यामुळे पोटाचे आजार निर्माण होऊ शकतात. रस्त्यावरील ज्यूस बनवणारे आधीच फळ कापून ठेवतात. यामुळे त्याच्यावर बॅक्टेरिया सहज निर्माण होतात. असे ज्यूस प्यायल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते. यावर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही नारळाचे पाणी पियू शकता. तसेच तुम्हाला घरीच लिंबू पाणी आणि जलजीरा टाकून ज्यूस तयार करू शकता.

* सी फूड

पावसाळ्याच्या दिवसांत सी फूड खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात पाणी लगेच दूषित होण्याचे प्रमाण वाढते. बऱ्याच वेळा तुम्ही सी फूड चांगले धुवून आणि शिजवून घेतले तरी इन्फेक्शन होण्याचा धोका असतोच. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात जर तुम्हाला खायाचेच असेल तर तुम्ही चिकन आणि मटन खाऊ शकता.

* हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या तसे आरोग्यासाठी फायद्याचे असते. परंतु पावसाळ्यात पालेभाज्या खाणे टाळावे. पावसाळ्याच्या दिवसात पालेभाज्या ओल्याव्यामुळे लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेचा पालक , कोबी व्यवस्थित शिजवल्यावरी जंतूचा धोका असतोच. असे पदार्थ खाल्यास आपल्या आरोग्यास हानी पोहोचू शकते. यामुळेच आशा दिवसात फळे आणि भाज्याचा खायला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com