Healthy Tips: केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे 'Hot Chocolate'

अनेक लोकांना हिवाळ्यात हॉट चॉकलेट प्यायला खुप आवडते.
Hot Chocolate
Hot Chocolate Dainik Gomantak

Healthy Tips: अनेक लोकांना हिवाळ्यात हॉट चॉकलेट प्यायला खुप आवडते. कारण थंडीच्या दिवसांमध्ये हॉट चॉकलेट पिण्याची मज्जाच वेगळी असते. हॉट चॉकलेटचा एक कप तुमच्या जिभेचे चोचले तर पुरवेलच पण पण दिवसभर शरीराला फ्रेश देखील ठेवेल.

  • हाड मजबुत होतात

हॉट चॉकलेटमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे हाडं निरोगी आणि मजबूत राहतात. तसेच शरीरातील अनेक समस्या टाळण्यास मदत होते. तुम्ही स्वत:चा मुड चांगला करण्यासाठी किंवा फिट राहण्यासाठी देखील हॉट चॉकलेट पिऊ शकता.

  • सुरकुत्या कमी करतात

त्वचेवरच्या सुरकुत्या आणि वृद्धत्वापासून बचाव करायचा असेल तर हॉट चॉकलेटचे सेवन करू शकता. यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करते.

  • संसर्गापासून बचाव

हॉट चॉकलेट पिण्याची खरी मज्जा हिवाळ्यात येते. हॉट चॉकलेट कोको पावडर आणि दुधापासून तयार केले जाते. या अँटिऑक्सिडेंट युक्त पेयामध्ये फ्लेव्होनॉइड्स आढळतात, जे शरीराला हंगामी संसर्गापासून दूर ठेवतात.

  • वजन कमी होते

वजन कमी करायचे असेल तर हॉट चॉकलेटचे सेवन करू शकता. वर्कआउट करण्यापूर्वी कोको पावडरचे सेवन केल्याने शरीरातील प्रथिनांचे प्रमाण तर वाढतेच पण वजन कमी होण्यासही मदत होते. तसेच बराच वेळ पोट भरलेले राहते.

  • रक्ताभिसरण चांगले

कोकोमध्ये पॉलिफेनॉलिक संयुगे पूर्णपणे समृद्ध असतात. त्यामुळे शरीरातील रक्तदाब वाढण्याची शक्यता कमी होते. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासोबतच शरीरातील खराब कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवता येते. तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो.

  • मुड स्विंग नियंत्रणात राहते

हॉट चॉकलेट प्यायल्याने मूड स्विंग नियंत्रणात ठेवता येते. हे प्यायल्याने शरीरातील हार्मान्समद्ये सकारात्मक बदल होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com