Healthy Tips: भूक लागत नसेल तर फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही पुढील गोष्टी फॉलो करू शकता.
Healthy Tips
Healthy TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Healthy Tips: अनेकांना भूक लागत नाही, त्यामुळे त्याची तब्बेत सुधरत नाही. त्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही आणि मग शरीर अनेक आजारांना बळी पडते. काही लोक भूक वाढवण्यासाठी औषधे वगैरे घेऊ लागतात, ज्याचे फायदे कमी आणि नुकसान जास्त होते. यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होणार नाही.

  • भूक वाढवण्यासाठी काय करावे

हलके जेवण घ्यावे

बरेच लोक दिवसातून तीन वेळा जास्त खातात. त्याऐवजी दिवसभर वारंवार आणि हलके जेवण खाण्याची सवय लावावी. यामुळे तुमच्या शरीराला दिवसभर पोषक तत्व मिळत राहतील, ज्यामुळे तुमची एनर्जी लेव्हल अबाधित राहील. याशिवाय तुमची पचनसंस्थाही निरोगी राहते कारण तुम्ही हलके आणि कमी आहार घेतात.

नियमितपणे व्यायाम करा

दररोज काही हलकी शारीरिक क्रिया करणे ही चांगली सवय आहे. जर तुम्ही ही सवय लावली तर तुमची भूक वाढू शकते. कारण त्यामुळे भूक वाढवणारे हार्मोन्स वाढतात. खरं तर, जेव्हा तुम्ही स्वतःला सक्रिय ठेवता तेव्हा तुमची भूक वाढते. यासोबतच व्यायामामुळे पचनक्रिया सुधारते.

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे भूक लवकर लागते. जर तुम्हाला भूक वाढवायची असेल, तर फायबरयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित करा. जेणेकरून तुम्हाला लवकर भूक लागेल. यासाठी तुमच्या आहारात पांढरे तांदूळ, केळी आणि खरबूज यांचे अधिक सेवन करा आणि दुसरीकडे पेरू, बदाम आणि रताळे यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांपासून दूर राहावे.

स्ट्रेस घेऊ नका

अनेक कारणांमुळे लोक तणावग्रस्त आणि चिंतेत राहतात. ज्यामुळे त्यांना काहीही खाणे किंवा प्यावेसे वाटत नाही. यासोबतच तणावामुळे पचनसंस्था देखील बिघडते. ज्यामुळे तुम्हाला कमी भूक लागते तर तणाव कमी केल्याने निरोगी अन्न खाणे सोपे होते. त्यामुळे तुमची भूक वाढवण्यासाठी तणावाचे व्यवस्थापन करावे.

भरपुर पाणी प्यावे

बरेच लोक खाण्यापूर्वी पाण्यासह मोठ्या प्रमाणात द्रवपदार्थ पितात. ज्यामुळे त्यांची भूक कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, शीतपेये पोटातील आम्ल देखील कमी करू शकतात. जे अन्न पचण्यास विलंब करण्यास मदत करते. तुम्ही दिवसभर हायड्रेशनकडे लक्ष दिले पाहिजे, परंतु जेवताना थोडेसे पाणी प्या, जेणेकरून तुमचे पोट फक्त पाण्यानेच भरणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com