Healthy Relationship: सध्याच्या काळात मुली लग्नानंतर एकत्रित कुटुंबासबोत न राहण्याला प्राधान्य देतात तर आजही अशा काही मुली आहेत ज्या एकत्रित कुटुंबासोबत राहणे पसंद करतात. त्यामुळे लग्न झाल्यानंतर मुली सासरच्या मंडळींची मनं जिकण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करतात.
पण लहानपणापासून ज्या मुलींना एकत्रित कुटूंबात राहण्याची सवय नसते अशी मुलींना जुळवून घेणे अवघड जाते. यामुळे लग्नानंतर एकत्रित कुटूंब साभांळणे कठिण होते.
बरोबरीच्या लोकांशी जुळवून घ्यावे
तुमच्या सासरच्या लोकांमध्ये तुम्हाला मिक्स व्हायचे असेल तर तुमच्या बरोबरीच्या लोकांशी मैत्री करावी. एकदा कुटूंबातील ननद, वहिनी यासारख्या नात्यांशी जुळवून घेतले की तुम्हाला सहज सासरच्या लोकांची मनं जिंकता येईल.
नवऱ्याचा विश्वास जिंकावा
सासरच्या लोकांची मनं जिंकायची असेल तर त्यासाठी सर्वात पहिले नवऱ्याचा विश्वास जिंकावा. तुमचे नवऱ्याशी नातं घट्ट झाले की तुम्हाला कोणतेही समस्या मोठी वाटणार नाही. तुमच्या कृतीतून नवऱ्याचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करावा.
मोठ्यांचा आदर करावा
लग्नानंतर सासरच्या कुटूंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा. त्यांच्याशी नेहमी नम्रतेने बोलावे. त्यांची आवड-निवड जाणून घ्यावी. तुम्ही त्यांचा आदर करत नाही असा विचार त्याच्या मनात येऊ देऊ नका.
माफ करायला शिका
लग्नानंतर मुलींनी माफ करायला शिकायला हवे. हे सोपे नसेल तरी तुम्हाला करावे लागेल. कुटूंबात कोणत्याही प्रकारचे मतभेद आणि भांडणे टाळण्यासाठी कुटूंबातील सदस्यांकडून काही चुका झाल्यास माफ करायला शिका. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन सर्वांशी प्रेमाने वागावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.