Ganesh Chaturthi Special Look: गणेश चतुर्थीला खास दिसण्यासाठी असा करा झटपट मेकअप

तुम्हालाही गणेश चतुर्थीला खास दिसायचे असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता.
Ganesh Chaturthi Special Look
Ganesh Chaturthi Special LookDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi Special Look: गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीला बाप्पाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज झाले आहे. त्याच्या तयारीसाठी मार्केट देखील विविध वस्तुंनी सजल्या आहेत.

देशभरात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा १९ सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दहा दिवस साजरा केला जाणारा हा सण अनंत चतुर्थीला संपणार आहे. महिला पुरूष पारंपारिक वेशभुषा करून बाप्पांच्या दर्शनला जातात.

अनेक महिलांना मंदिरात जाताना कसा मेक-अप करावा हे समजत नाही. गणेश उत्सवादरम्यान तुम्ही एथनिक लूक परिधान करत असाल, तर या प्रकारच्या मेकअपमुळे तुमचा लूक सुंदर होऊ शकतो. .

  • प्रायमर

मेकअप करताना सर्वा पहिले प्रायमर लावावे. यामुळे चेहऱ्यावर मेकअपचा डायरेक्ट परिणाम होत नाही. तसेच मेकअप चांगला होतो.

  • बीबी क्रीम किंवा फाउंडेशन

गणेशोत्सवामध्ये खास दिसण्यासाठी तुम्हाला हेवी मेकअपची गरज नसते. तुम्ही जी बीबी क्रीम किंवा फाऊंडेशन वापरता ते लाइट असावे याची खात्री करून घ्यावी. खूप जास्त भडक मेकअप करणे टाळावा.

Ganesh Chaturthi Special Look
Cleaning Tips: प्लास्टिकची खुर्ची खराब झाल्यास असे करा स्वच्छ
  • ब्लश आणि हायलाइटर

तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी गालावर थोडेसे ब्लश आणि चेहऱ्यावर हायलाइटर लावावे. यामुळे तुमच्या चेहऱ्याची चमक कायम राहील. तुमच्या चेहऱ्याची चमक कायम राहील.

  • डोळ्यांचा मेकअप

लाइट मेकअप केल्यानंतर पूजेनुसार डोळ्यांचा मेकअपही लाइट करावा. डोळ्यांचा डार्क मेकअप करणे टाळावा. कारण यामुळे तुमचा मेकअप खराब होऊ शकतो.

  • लिपस्टिक

सर्वात शेवटी गणेशोत्सवादरम्यान मेकअप करतांना जास्त काळजी घ्यावी. लाइट मेकअप केल्यावर लिपस्टिक देखील लाइट रंगाची वापरावी.यामुळे तुमचा लुक परफेक्ट दिसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com