Healthy Ragi Chila Recipe: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात नाचणीचे पराठे सर्वोत्तम

Healthy Breakfast: रागी चीला एक ग्लूटेन फ्री डिश आहे, ज्यामध्ये कॅलरीज कमी असतात
Healthy Ragi Chila Recipe
Healthy Ragi Chila RecipeDainik Gomantak

रागी चीला एक ग्लूटेन फ्री डिश आहे, ज्यामध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याच्या विचार करत असाल रागी चीलाचे सेवन करावे. ते चवदार बनवण्यासाठी तुम्ही त्यात हिरव्या भाज्या टाकू शकता. ज्यामुळे त्याची चव तर वाढेलच शिवाय ही डिश आणखी आरोग्यदायी होईल. (Healthy Ragi Chila Recipe News)

* नाचणी चीला बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी नाचणीचे पीठ
1 टीस्पून लाल मिरची
1 टीस्पून कोरडी कैरी पावडर
बारिक चिरलेली कोथिंबीर
2 टोमॅटो
2 टेबलस्पून तेल
2 वाट्या दही
1 टीस्पून धने पावडर
1टीस्पून हिंग
1 टीस्पून काळी मिरी
2 कांदे
2 चमचे मैदा २ चमचे

चवीनुसार मीठ

* नाचणी चीला बनवण्याची कृती
एका खोलगट भांड्यात नाचणीचे पीठ, बेसन आणि दही घाला. त्याचे पीठ चांगले तयार करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि हिरवी कोथिंबीर घाला. आता त्यात मीठ, काळी मिरी पावडर, लाल तिखट, आंबा पावडर, धनेपूड आणि हिंग मिक्स करावे. जर तुम्हाला हे पीठ घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं पाणी घालून नीट मिक्स करून घ्या.

आता नॉन स्टिक तव्यावर एक चमचा तेलाने ग्रीस करा. आता चमच्याच्या साहाय्याने पीठ पसरवा आणि गोलाकार आकार द्या. आता दोन्ही बाजूंनी साधारण 5 मिनिटे शिजू द्या. दुसऱ्या बाजूलाही बेक करा. ते सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत झाल्यावर सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. तुम्ही केचप,दही किंवा कोणत्याही चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com