फळांसह फळांचा ज्युस पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. एक ग्लास ज्युस प्यायल्याने शरीर आणि मन फ्रेश होते. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्याची आपल्या शरीराला रोजच्या कार्यासाठी गरज असते.
याशिवाय ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. विशिष्ट प्रकारच्या फळांचा रस प्यायल्याने चेहऱ्याची चमकही वाढते. रोज ज्युस पिणे आरोग्यदायी आहे पण ज्युस जास्त वेळ टिकून राहत नाही. ते लवकर खराब होते.
तुम्ही बराच वेळ ठवलेला ज्युस पित असाल तर आरोग्यासाठी फायदेशीर नसते. तुम्हाला जर निरोगी राहण्यासाठी ज्युस प्यायचा असेल तर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
घरी ज्युस कसा बनवावा
जर तुम्ही घरी ज्यूस बनवत असाल तर ते शक्य तितके निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे कधीही त्यात साखर साखर घालू नका. साखर टाकल्यास चव वाढेल, परंतु त्याचे फायदे कमी होतील. दुसरे म्हणजे, ज्यूस गाळून पिऊ नका, कारण त्यातून शरीराला आवश्यक फायबर मिळत नाही. ते चांगले बारीक करा जेणेकरून फळे चघळण्याची गरज नाही, परंतु ते गाळू नका.
ज्युस कधी प्यावा?
डॉक्टरांच्या मते, रिकाम्या पोटी ज्यूस पिणे सर्वात फायदेशीर असते. यामुळे तुमची पचनसंस्था रसातील सर्व पोषक तत्वे योग्य प्रकारे शोषून घेते. जेव्हा तुम्ही नाश्ता दरम्यान किंवा लगेच ज्यूस पितात तेव्हा तुम्हाला ज्यूसचे फायदे मिळतात, परंतु कमी प्रमाणात मिळतात. दुसरा पर्याय म्हणजे जेवणानंतर किमान दोन तासांनी ज्यूस पिणे किंवा ज्यूस प्यायल्यानंतर अर्ध्या तासाने जेवण घेणे फायदेशीर असते.
ज्युस पिण्याची योग्य पद्धत कोणती
जर तुम्हीही पाण्याप्रमाणे एकाच वेळी ज्यूस पित असाल तर असे करू नका. ज्युस किंवा पाणी नेहमी आरामात बसून हळूहळू प्यावे. यामुळे, शरीर त्यात असलेले पोषण चांगले शोषून घेते. ते एकाच वेळी पटकन प्यायल्याने रक्तातील साखर वाढू शकते .
ज्युस कसे स्टोअर करावे
जर तुम्हाला फ्रेश ज्युस काही काळ स्टोअर करायचा असेल तर हवाबंद काचेच्या डब्यात ठेवावा. हे ऑक्सिडेशन प्रक्रिया थांबवते. यामुळे ज्युसची चव आणि रंग बदलत नाही. पण ते फ्रिजमध्ये असले तरीही, रस 24 तासांपेक्षा जास्त काळ ठेवू नका.
ज्युस पिण्याचे फायदे
चेहऱ्यावर कायम चमक राहते
उन्हाळ्यात ज्युस प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.
वजन कमी हण्यास मदत मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.