Eating Tips: ...म्हणून चमच्याने नव्हे तर हाताने जेवणं करणे चांगलं!

Lifestyle: बदलत्या जीवनशैलीमध्ये आता चमच्याने खाण्याचा ट्रेंड वाढला आहे, परंतु आजही असे बरेच लोक आहेत जे चमच्याऐवजी हाताने जेवण करतात.
Eating Tips| Eating with hands
Eating Tips| Eating with handsDainik Gomantak

झपाट्याने बदलत चाललेली संस्कृती आणि लाइफस्टाइल अन्न खाण्याच्या पद्धतीतही मोठे बदल दिसून आले आहेत. विशेषत: चमच्याचा वापर खूप वाढला आहे. हल्ली हाताने खाण्याऐवजी चमच्याने खाण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. तरुणाईला ते खूप आवडते. पण पोषणतज्ञांच्या मते, चमच्याने खाण्यापेक्षा (Food) हाताने खाण्याची पध्दत खूप चांगली आहे. याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया अन्न चमच्याऐवजी हाताने का खावे.

  • चमच्याने खाणे हानिकारक का?

अलिकडेच प्रकाशित झालेल्या आरोग्य अहवालानुसार जे लोक चमच्याने किंवा काट्याचे चमचे वापरुन दीर्घकाळ अन्न खातात त्यांना रक्तातील साखरेचे संतुलन बिघडण्याचा धोका जास्त असतो. यामुळे टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे चमच्याने न खाता हाताने खाण्याचा प्रयत्न करावा.

  • पदार्थाची चव वाढते

आयुर्वेदानुसार हाताने अन्न खाण्याचे अनेक फायदे आहेत. हाताने अन्न खाल्ल्याने चव चांगली लागते, मग अन्नाचे पचनही चांगले होते.

Eating Tips| Eating with hands
Tick Tock Day 2022: सरत्या वर्षाची आठवण करून देणारा 'हा' दिवस, जाणून घ्या महत्व
  • स्नायूंचा व्यायाम होतो

हाताने अन्न खाताना हातांच्या स्नायूंचा व्यायामही चांगल्या पद्धतीने पूर्ण होतो. तसेच असे मानले जाते की हाताने अन्न खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते. जेवताना किंवा अन्न बनवताना सर्व सांध्यांचाही हाताने चांगला व्यायाम होतो, त्यामुळे त्यांची लवचिकताही चांगली असते.

  • अन्नाचे पचन चांगले होते

आयुर्वेदानुसार, आपल्या बोटांच्या वरच्या भागात असलेल्या नसांना वारंवार स्पर्श केल्याने आपली पचनशक्ती देखील मजबूत होते. तसेच हाताने पदार्थ खाताना त्याचा सुगंध आणि चवही चांगल्या प्रकारे अनुभवता येते.

  • खाण्यापूर्वी हात धुवा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते जेवण करण्यापूर्वी तुम्ही तुमचे हात चांगले धुवावेत. काही काम करत असताना आपल्या हातावर बॅक्टेरिया आणि जंतू चिकटून राहू शकतात. जे अन्नासोबतच पोट, घसा, तोंड आणि आतड्यांपर्यंत जाऊन समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे काहीही खाण्यापूर्वी हात धुतले तर बरे होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com