Weight Loss Tips: सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणं होत नाही. ऑफिसमध्ये किंवा बैठे काम करुन अनेक लोकांचे वजन वाढत आहे. पण वजन कमी करणे प्रत्येकासाठी सोपे नसते.
यासाठी निरोगी आहार आणि व्यायाम करणे गरजेचे असते. पण आम्ही तुम्हाला खाऊन- पिऊन वजन कसे कमी करायचे याचे सिक्रिट सांगणार आहोत.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिवसभर कोणता आहार घेत आहात हे सर्वात महत्त्वाचे आहे
तूप आणि गरम पाणी
आपल्या देशात चांगल्या आरोग्यासाठी तूप खूप फायदेशीर मानले गेले आहे. त्याचबरोबर तुपाचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगण्यात आले आहेत. त्यात हेल्दी फॅट असते. तुपात जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात. दुसरीकडे, कोमट पाण्यात मिक्स केल्यास ते पचन आणि चयापचय वाढविण्यात खूप मदत करते. पाण्यात तूप मिसळून ते प्यायल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते, त्यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी होते.
लिंबू पाणी
जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात लिंबू पाणी पिऊन करत असाल तर त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. त्यात पेक्टिन नावाचा फायबर देखील आढळतो, जो तुमची भूक नियंत्रित करतो. त्याचबरोबर यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी तुमचे मेटाबॉलिज्म कमी करण्याचे काम करते.
ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोमट पाण्यात सफरचंद सायडर व्हिनेगर, मध आणि लिंबाचा रस (Lemon Juice) मिसळून प्यायल्याने फुगण्याची समस्या दूर होते. याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि साखरेची लालसा दोन्ही कमी होते. ऍपल सायडर व्हिनेगर चरबी दूर करण्याचे काम करते.
हळदीचे पाणी
भारतात (India) हळदीला खूप महत्त्व आहे. आम्ही अनेक वर्षांपासून याचा वापर करत आहोत. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे शरीराची सूज कमी करण्यासोबतच वजन कमी करण्यातही फायदेशीर ठरतात. दुसरीकडे वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी कोमट पाण्यात हळद, मध आणि लिंबू मिसळून रोज सकाळी प्या. हळद पचन सुधारण्यासाठी तसेच चयापचय वाढवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
हर्बल डिटॉक्स चहा
जर तुम्ही सकाळी उठून हर्बल डिटॉक्स चहाचे सेवन केले तर ते तुमचे वजन कमी करण्यासही खूप उपयुक्त ठरेल. त्याच्या वापराने तुमचे शरीर डिटॉक्सिफाय होते. जर तुम्ही आले, काळी मिरी किंवा पुदिना यापासून बनवलेल्या हर्बल चहाचे सेवन केले तर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.