Hing Water Benefits: हिंगाचे पाणी पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. औषधी गुणांनी भरलेले हे पाणी शरीराला अनेक आजारांपासून दुर ठेवते. हिंगाचे पाणी गॅस, अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या लवकर दूर करू शकतात.
वजन कमी करायचे असेल, हृदयविकार टाळायचा असेल तर हिंगाचे पाणी फायदेशीर आहे. एका अहवालानुसार हिंगाच्या पाण्याचा कर्करोग आणि मधुमेहाच्या रुग्णांनाही फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया हिंगाच्या पाण्याचे 5 जबरदस्त फायदे कोणते आहेत.
हिंगाचे पाणी कसे बनवायचे
एक ग्लास पाणी गरम करा.
गरम पाण्यात हिंग मिक्स करावे.
हिंग पाण्यात चांगले विरघळवून घ्या.
नंतर त्या पाण्याचे सेवन करावे.
हिंगाच्या पाण्याचे 5 फायदे
हृदयविकारापासून दुर ठेवते
हिंगमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्याचे काम करते. हे तुम्हाला जळजळ, हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेहापासून वाचवू शकते.
पचनसंस्था सुरळित राहते
हिंगामुळे पचनक्रिया खूप मजबूत होते. हिंग अपचन, पोटदुखी, अॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून आराम देण्याचे काम करते. याचे नियमित सेवन केल्यास इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) कमी होऊ शकतो. यामुळे पोटही स्वच्छ राहते.
वजन कमी होते
हिंगच्या पाण्याचा दररोज वापर करून तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. हिंग पचन सुधारते आणि वाढलेले पोट देखील कमी करते. यामुळे लठ्ठपणाही कमी होऊ शकतो.
रक्तातील साखर नियंत्रित करते
हिंगाचा दररोज वापर केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. रोज सकाळी हिंगाचे पाणी प्यायल्याने साखरेची पातळी कायम राहते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांना हिंगाचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
चेहरा चमकदार होतो
हिंग आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो. याचा वापर केल्याने सुरकुत्या, पिंपल्ससारख्या समस्यांपासून सुटका कमी होउन चमदार होउ शकतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.