Asthama: उत्तम आरोग्यासाठी अस्थमाच्या रुग्णांनी वाढत्या प्रदूषणात 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्यात

दम्याचा वेळेवर उपचार न केल्यास तो जुनाट आजार बनतो आणि प्राणघातक ठरू शकतो.
Asthama
AsthamaDainik Gomantak

देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi NCR) वायू प्रदूषणाची पातळी वाढत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे अस्थमाच्या रुग्णांनाही त्रास होऊ शकतो. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला अस्थमाचा त्रास होऊ शकतो. मुले आणि वृद्धांमध्ये याच प्रमाण अधिक आहे. ग्लोबल अस्थमा (Asthama) अहवाल 2018 नुसार, भारतात सुमारे सहा टक्के मुलांना अस्थमाचा आजार आहे. तर, सुमारे 10 कोटी लोक श्वसनाच्या विविध आजारांनी त्रस्त आहेत.

Asthama
Ethanol Plant: 455 कोटींचा आशिया खंडातील सर्वात मोठा इथेनॉल प्लांट तयार, महागड्या इंधनापासून मिळणार दिलासा

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, या आजारामुळे काही देशांत मृत्यू देखील होतात. दम्याचा वेळेवर उपचार न केल्यास तो जुनाट आजार बनतो आणि प्राणघातक ठरू शकतो. प्रदूषणाच्या वाढीमुळे अस्थमाच्या रुग्णांना अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा रुग्णांनी आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांना दम्याचा झटकाही येऊ शकतो. ज्या भागात अधिक प्रदूषण आहे त्या भागातील लोकांमध्ये दम्याचे प्रमाण जास्त आहे. दिल्ली आणि एनसीआरमध्ये या आजाराच्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे.

दमा हा फुफ्फुसाचा आजार आहे, त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. या आजारात श्वसनमार्गामध्ये सूज येऊ शकते. यामुळे ट्यूब आकुंचन पावते. वाढत्या प्रदूषणामुळे किंवा थंडीमुळे अस्थमाचा त्रास होतो. प्रदूषण, धूळ आणि धूर यांच्या संपर्कात आल्याने हा आजार वाढतो. काही लोकांना हा आजार गंभीर ऍलर्जी आणि अनुवांशिक कारणांमुळे होतो.

Asthama
Meditation संबंधित हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का?

दम्याच्या रुग्णांनी अशा प्रकारे स्वतःची काळजी घ्यावी

इनहेलर नेहमी सोबत ठेवावा. बाहेर जाताना मास्क घालावा तसेच, बाहेर असताना मास्क काढू नये.

आहाराची काळजी घ्यावी आणि आहारात व्हिटॅमिन ईचा समावेश करावा.

धूळ, धूर आणि प्रदूषणापासून काळजी घ्यावी. दम्याच्या उपचारासाठी जी औषधे चालू आहेत ती नियमितपणे घ्यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com