Dalia Health Benefits : दलिया 'या' आजारांवर आहे अतिशय गुणकारी; जाणून घ्या

दलियाचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.
Dalia Health Benefits
Dalia Health BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

रोजच्या डोकेदुखीत 'आज नाश्त्यात काय खावे' हा प्रश्न विशेषत: महिलांना रोज रात्री पडत असतो. सकाळी उठल्यावर नाश्त्यात काय करायचं हा प्रश्न पडतो. दलिया न्याहारीसाठी एक उत्तम पदार्थ आहे. पण दलियाचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कारण कुणाला दलियाची चव आवडते तर, कुणाला नाही. दलिया खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. (Dalia Health Benefits)

Dalia Health Benefits
Camphor benefits: कापरचे 'हे' आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क!

दलियामध्ये कोणते पोषक घटक आढळतात?

दलिया हे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचे एक अद्भुत संयोजन आहे. गहू भाजून दळून ते तयार केले जाते. दलियामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. तुम्ही नाश्तासाठी, स्नॅकच्या वेळेत किंवा रात्रीच्या जेवणासाठी दलिया खाऊ शकता. दलिया दोन प्रकारे तयार आणि खाल्ले जाते. तुम्ही गोड दलिया देखील खाऊ शकता. जी तुम्ही दुधात घालून खीरसारखी शिजऊ शकता. आणि दुसरी पध्दत म्हणजे जिरे, हिंग, कढीपत्ता वगैरे टाकून दलिया करू शकता. ही खिचडी किंवा उपमा सारखी तयार केली जाते.

दलिया खाण्याचे फायदे

  • पचनक्रिया सुरळित चालते. जर तुम्हाला अपचन आणि गॅसची समस्या असेल तर दिवसातून एकदा दलिया नक्की खा.

  • जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल आणि अनेकदा काही आजार तुम्हाला घेरतात, तर तुम्ही दिवसातून एकदा दलियाचे सेवन करावे.

  • मुलांच्या वाढीस प्रोत्साहन देते. चांगली उंची आणि आरोग्यासाठी, मुलांना एका वेळी दलिया खायला दिली पाहिजे.

  • झोपेची समस्या असेल तर दलियाचे सेवन करावे.

  • ज्या लोकांना रक्तदाब कमी आहे किंवा कमजोरी आहे, त्यांनीही दिवसातून एकदा दलिया खावे.

  • बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी दलियाचे सेवन करा. पोट निरोगी राहील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com