Skin Care: थकवा, त्वचेच्या समस्या ही सगळी कसली लक्षणं आहेत? वेळीच सावध व्हा!!

Health Implications of Stress on Skin: Always Be Presentable च्या नादात मेकअप आणि तत्सम गोष्टींचा अवलंब होतो. मात्र तुम्हाला माहितीये तुम्ही त्वचा नव्हे तर मानसिक समस्येवर या मेकअपद्वारे मार्ग काढताय?
Health Implications of Stress on Skin:  Always Be Presentable च्या नादात मेकअप आणि तत्सम गोष्टींचा अवलंब होतो. मात्र  तुम्हाला माहितीये तुम्ही त्वचा नव्हे तर मानसिक समस्येवर या मेकअपद्वारे मार्ग काढताय?
Stress and Health Implications Dainik Gomantak
Published on
Updated on

Health Implications of Stress on Skin Explained in Marathi

काम, घर आणि नातीगोती हे सगळं सांभाळताना मन आणि शरीर थकून जातं. कालांतराने हाच थकवा चेहऱ्यावर ठळक दिसू लागतो. आपल्या चेहरा हाच आपल्यासाठी सर्वात महत्वाचा असतो, आपले हाव-भाव किंवा एकूणच चेहऱ्यावरील लहानमोठ्या घटकांमुळे आजूबाजूला वावरणाऱ्यांवर आपला प्रभाव पडतो. Always Be Presentable च्या नादात मेकअप आणि तत्सम गोष्टींचा अवलंब होतो. मात्र तुम्हाला माहितीये तुम्ही त्वचा नव्हे तर मानसिक समस्येवर या मेकअपद्वारे मार्ग काढताय?

त्वचेसंबंधित समस्यांवर उपाय म्हणून आपण डॉक्टरकडे जातो, अगदीच काही गंभीर वाटत असेल तर आपण त्वचारोगतज्ज्ञांकडे जातो... डॉक्टर काही औषधं देतात, मात्र काहीकाळानंतर पुन्हा स्किन प्रॉब्लेम्स निर्माण होतात. अशावेळी काय करावं?

Health Implications of Stress on Skin:  Always Be Presentable च्या नादात मेकअप आणि तत्सम गोष्टींचा अवलंब होतो. मात्र  तुम्हाला माहितीये तुम्ही त्वचा नव्हे तर मानसिक समस्येवर या मेकअपद्वारे मार्ग काढताय?
Skin Care Tips: त्वचेची घ्या काळजी; या 5 गोष्टी फॉलो करा!!

खरंतर या सगळ्याचं उत्तर दडंलय ते मानसिक आरोग्यात. आपलं मन आनंदी आहे का हे तपासून पाहावं. दैनंदिन जीवनात वावरताना आपण इतरत्र व्यवस्थित लक्ष देतो, सर्व जबाबदाऱ्या पार पडताना तारेवरची कसरत करतो मात्र स्वतःसाठी जगायचं विसरून जातो.

ताण कमी करण्यासाठी काय करावं?

काहीकाळ स्वतःसाठी बाजूला काढत व्यायाम, प्राणायाम किंवा ध्यानधारणा (मेडिटेशन) केल्याने मनावरचा भार हलका व्हायला मदत होते, ताण कमी होतो आणि झोप देखील होते आणि मन प्रसन्न राहायला मदत मिळते.

ताणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

स्किन प्रॉब्लेम्स हे केवळ मानसिक ताणामुळे होणारे नसतात यामध्ये अनेकवेळा आपण कोणत्या वातावरणात वावरत आहोत, आपला आहार कसा आहे अशा अनेक घटकांचा देखील समावेश असतो आणि म्हणूनच सायकोडर्मेटॉलॉजीस नेहमीच शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही उपाय सुचवतात.

माणसाला ताण आल्यानंतर शरीरात कार्टिसोल नावाचा हॉर्मोन तयार होतो, या कार्टोसोलमुळे जळजळ किंवा अंगभर खाज उठण्यासारखे प्रकार निर्माण होतात. मानसिक आरोग्या तज्ज्ञांच्या मते कायम तणावात असलेल्या माणसाच्या शरीरात कार्टिसोलचं प्रमाण वाढत जातं आणि परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आपण विचारही केलेला नसेल अशा शारीरिक आजारांचा पुढे सामना करावा लागू शकतो आणि म्हणून काहीकाळ स्वतःसाठी जगणं महत्वचं आहे.

मित्र, कुटुंबीयांशी बोला

मनाला निरोगी आणि ताण-तणावमुक्त ठेवण्यासाठी काय कराल? तर तुमच्या भावनांना व्यक्त होण्याची संधी द्या, तुम्हाला काय वाटतंय हे बोलून बघा. घरच्यांशी किंवा एखाद्या मित्राशी संवाद साधा. आजूबाजूच्यांशी बोलणं रुचत नसेल तर जर्नालिन्ग सुरु करा, यामुळे काय होईल तर तुमच्या भावनांना नितळपणे व्यक्त होण्याची संधी मिळेल.

असं म्हणतात बोलून ताण कमी होतो, त्यामुळे बोला आणि मुक्त व्हा. केवळ इतरांसाठी सुंदर दिसताना आपण स्वतः साठी जगणं विसरून जातो आणि म्हणूनच खरोखर ग्लो हवा असेल तर मनावरचा ताण हा कमी झालाच पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com