Manish Jadhav
आजच्या धावपळीच्या जगात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याकडेही कुणाला वेळ नाहीये. नोकरी ही आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे.
कामाच्या वेळी काम आणि इतर वेळी मनसोक्तपणे आयुष्य जगता आले पाहिजे. मात्र अनेकजण सतत कामामुळे तणावात असतात.
तुम्ही कामाचा स्ट्रेस घेता का? कामामुळे तणावात राहण्याची खालील लक्षणे दिसून येतात.
ऑफिसमध्ये घडणाऱ्या गोष्टींबद्दल अनेकजण सतत बोलतात. मॅनेजर किंवा बॉसविषयी सतत चर्चा करता.
कामापासून ब्रेक घेण्यासाठी सुट्टी असते पण सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही मेल पाहात असाल, तर हे चुकीचे आहे.
तुम्हाला अति काम करायची इच्छा नसते. परंतु काही कारणांमुळे तुम्ही बोलत नाही आणि प्रत्येक जण त्याचा फायदा घेत तुमच्यावर काम सोपवतात.
अनेक जण डेडलाइन पूर्ण करण्याच्या नादात ऑफिसवरुन घरी आल्यानंतर पुन्हा काम करतात.