जग पाहण्याची उर्मी

जागतिक पर्यटन महासंघाने त्यांच्या साऱ्या सदस्यांना, व्यवसायिकांना, व्यक्तींना या पर्यटन दिनाच्या निमित्ताने एक हाक दिली आहे,
जग पाहण्याची उर्मी
जग पाहण्याची उर्मी Dainik Gomantak
Published on
Updated on

आमच्या सगळ्यांच्या मनात नेहमीच पिंगा घालून असते पण गेली दीड वर्षे जगभर थैमान घालून असलेल्या कोविड-19 (Covid-19) ने जगभरच्या लोकांच्या प्रवास करण्याच्या या साऱ्या प्रेरणांना लगाम घालून ठेवला. मानसिक, सामाजिक आणि आर्थिक अशा सर्व पातळ्यांवर कोविडने केलेल्या प्रहाराने अस्ताव्यस्त झालेले जग आताच कुठे हळूहळू भानावर येते आहे. विकसित आणि विकसनशील या दोन्ही वर्गातल्या देशांना कोविडने एकसमान हादरवून टाकले.

जग पाहण्याची उर्मी
World Tourism Day 2021: सुरक्षित प्रवासाकरीता फॉलो करा या टिप्स

इतर साऱ्याच क्षेत्राप्रमाणे पर्यटन क्षेत्राशी संबंधित असलेल्या ‘वल्नरेबल’ समूहाला हा कोविड-19 सर्वात अधिक दु;सह्य ठरला. पर्यटन सुरू करणे हिच या परिस्थितीतून बाहेर यायची आणि नव्या विकासाची सुरुवात असेल. त्यातून निर्माण होणारे फायदे हे सर्वव्यापी आणि सर्वांना आधारभूत होतील अशा उद्दिष्टाने, जागतिक पर्यटन महासंघाने 2021 हा पर्यटन दिन ‘टुरिझम फोर इंक्लुसिव्ह ग्रोथ’ अशा घोषातून स्पष्ट केला आहे. विकासासाठी सर्वसमावेशक पर्यटन! पर्यटनसंबंधींच्या आकडेवारीच्या पलीकडे, त्या सार्‍या संख्यां पलीकडे ‘एक माणूस’ आहे याचे भान आज असणे फार आवश्यक आहे. जागतिक पर्यटन महासंघाने त्यांच्या साऱ्या सदस्यांना, व्यवसायिकांना, व्यक्तींना या पर्यटन दिनाच्या निमित्ताने एक हाक दिली आहे,

पर्यटनाची अद्वितीय क्षमता सिद्ध करताना नव्या उजळणाऱ्या या जगातून एकही माणूस वगळला जाणार नाही याची दक्षता घेण्यासंबंधी ही हाक आहे. 27 सप्टेंबर या दिवशी दरवर्षी पर्यटन दिवस साजरा करण्यात येतो. ‘जगाच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय आणि आर्थिक पाठबळ असावे’ हा पर्यटन क्षेत्राचा नित्य संकल्प डोळ्याआड होणार नाही. हा दिवस साजरा करून अधोरेखित केले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com