World Tourism Day 2021: सुरक्षित प्रवासाकरीता फॉलो करा या टिप्स

प्रवास करतांना कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
World Tourism Day 2021: Be sure to follow these tips when traveling safely
World Tourism Day 2021: Be sure to follow these tips when traveling safelyDainik Gomantak
Published on
Updated on

जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रथम 1970 मध्ये घोषित करण्यात आला आणि संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने तो आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन महणून घोषित केला. जागतिक स्तरावर पर्यटनाचे महत्व आणि सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मुल्यावर होणाऱ्या परिणामाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जगातील अनेक देशांमध्ये प्रवासावरील निर्बंध कमी झाल्यामुळे, ट्रॅव्हल फ्रिक्स बाहेर पडण्यासाठी आणि पर्यटक बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण प्रवास करतांना कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रवास करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे हे जाणून घेवूया.

Dainik Gomantak

* जागतिक पर्यटन दिवस 2021 सुरक्षित प्रवासासाठी घ्यावयाच्या काळजी

  • सर्वात प्रथम तुम्ही ज्या ठिकाणी फितयला जाणार आहात त्या देशातील निर्बंध आणि महत्वाची मार्गदर्शक तत्वे माहिती करून घ्यावी. अनेक ठिकाणी कोविड-19 चाचणी नकारात्मक असलेले प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. हे नियम सुरक्षित प्रवासाचे नियोजन करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे.

  • पर्यंटनासाठी जातांना कोणत्या ठिकाणी जायचे याची आधी लिस्ट तयार करावी. यासाठी तुम्हाला वेबसाइट्सची मदत घेता येईल. कारण आजकाल सर्व पर्यटन स्थळे ऑनलाइन सर्च करता येतात. यामुळे आपल्याला योग्य ठिकाण शोधणे सोपे होते.

  • तुम्हाला ज्या गोष्टी आणि ठिकाणे एक्सप्लोर कारेचीय आहेत त्यांची यादी तयार करून नियोजन करावे.

  • सुरक्षित प्रवास करण्यासाठी बॅगमध्ये आयडी कार्ड, हँड सॅनिटायझर, वाईप्, टिश्यू, फेस मास्क, हेयर कॅप्स, फेस शील्ड, मास्क यासारख्या आवश्यक वस्तूंची यादी तयार करावी.

World Tourism Day 2021: Be sure to follow these tips when traveling safely
Travel Tips: प्रवासात मांसाहार करणे टाळावे
  • कोरोनापासून बचाव होण्यासाठी एटीएम, लिफ्ट बटणे किंवा इतर कोणत्याही वस्तूला हात लावल्यास काही अन्न खाताना स्वच्छ धुवावे.

  • प्रवास करतांना स्वता:च्या सुरक्षिततेसाठी कोरोनाच्या त्रीसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे.

  • प्रवास करतांना जंतूनाशक स्प्रे किंवा वाईप्सचा वापर करावा. यामुळे अनेक संसर्गापासून बचाव होण्यास मदत मिळते.

  • प्रवास करतांना पॅक केलेले अन्न आणि स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरावे.

  • शेवटी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आजारी असाल तर प्रवास करू नका. कारण तुमच्या आजूबाजूच्या लोकाना सुद्धा संसर्ग होण्याची भीती असते. तुम्ही संसर्ग पसरवण्यापासून स्वतची काळजी करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com