Happy Diwali 2023: दिवे अन् फटाके लावताना घ्या काळजी, अशा प्रकारे घरीच करा तयार प्रथमोपचार पेटी

तुम्हीही दिवाळीत फटाके फोडत असाल तर घरात काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
Happy Diwali 2023
Happy Diwali 2023Dainik Gomantak

Happy Diwali 2023: दिवाळी हा आनंदाचा सण आहे. त्याची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते. दिवाळीत लोक आपली घरे दिवे आणि लाइटिंग लावून सजवतात. फटाके फोडतात. यंदा दिवाळी 12 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. जर तुम्हीही या दिवाळीत फटाके वापरण्याचा विचार करत असाल तर या बाबतीत थोडे सावध राहावे. यामुळे तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच, घरी प्रथमोपचार पेटी तयार ठेवावी. जेणेकरुन तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला सहज उपचार करता येईल आणि तुम्ही दिवाळी आनंदात साजरी करू शकता.

ही काळजी घेणे गरजेचे असते

  • घरामध्ये चुकूनही फटाके फोडू नका. बाहेर मोकळ्या जागेत फटाके फोडावे.

  • फटाके फोडतांना लहान मुलांना दूर ठेवावे.

  • फटाके कुंडीत ठेवून फोडू नका किंवा काचेच्या बाटल्यांमध्ये फटाके फोडू नका.

  • गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडू नका. फटाके पेटवल्यानंतर फुटत नसेल तर लगेच त्याच्या जवळ जाऊ नका.

  • फटाके फोडताना किंवा दिवे लावताना सैल सुती कपडे घाला.

  • ज्या ठिकाणी फटाके फोडले जात आहेत त्या ठिकाणी पाण्याने भरलेली बादली ठेवावी.

  • मुलांना रॉकेट, अनार इत्यादी लावायला देऊ नका. जेव्हा मुलं स्पार्कलर इत्यादी खेळतात तेव्हा त्यांच्याबरोबर रहावे.

  • 100 डेसिबल किंवा त्यापेक्षा जास्त आवाज असलेल्या फटाक्यांमुळे कानाच्या पडद्याचे नुकसान होऊ शकते. याची काळजी घ्यावी.

  • कानात आवाज येत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • झिरो पॉवरचा गॉगल घालूनच फटाके फोडावे. फटाके हाताळताना हात सॅनिटायझरने धुऊ नका. साबणाने हात धुवावे.

Happy Diwali 2023
Relationship Tips: 'हे' गुण दाखवतात तुमचं नातं भावनिकदृष्ट्या किती सुरक्षित....

घरीच तयार करा प्रथमोपचारपेटी

दिवाळीपूर्वी घरी प्रथमोपचार पेटी तयार करावी. या पेटीत अँटी सेप्टिक क्रीम, पेन किलर, जखम साफ करणारे लोशन, पेनकिलर गोळ्या, स्वच्छ पट्टी, कापूस, अँटी सेप्टिक मलम, पेपर टेप, सॅव्हलॉन, छोटी कात्री आणि हातमोजे ठेवावे. किरकोळ दुखापत किंवा भाजल्यास या गोष्टी प्राथमिक उपचार म्हणून वापरता येतात. गंभीर समस्या असल्यास निष्काळजीपणा न करता लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com