Anil Kapoor's Fitness: तरुणांना लाजवेल असं फिटनेस; 67 व्या वर्षी अनिल कपूरचा फिटनेस फंडा काय?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आपल्या फिटनेसमुळे सोशम मिडियावर नेहमीच चर्चेत असतो.
Anil Kapoor Fitness
Anil Kapoor FitnessDainik Gomantak

Anil Kapoor's Fitness: अनिल कपूर यांनी 'हमारे तुम्हारे' या चित्रपटातून बॉलिवूड प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका त्यांना साकारल्या. आज अनिल कपूर त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पण त्याच्या फिटनेसमध्ये कोणताही फरक पडलेला नाही आणि याचा अंदाज त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात दिसून येतो. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया फिटनेसचे सिक्रेट काय आहे.

नियमितपणे व्यायम करणे

अनिल कपूर हे एक फिटनेस फ्रिक आहे आणि चित्रपटाच्या शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असले तरीही ते दररोज व्यायाम करतात यावरून याचा अंदाज लावता येतो. ते आठवड्यातून 3 दिवस जिममध्ये जातात आणि 2 ते 3 तास वर्कआउट करतात. तसेच उरलेल्या दिवसांत त्यांना कॅलरी बर्न करण्यासाठी बाह्य कार्डिओ सेशन आणि योगासने करणे आवडते .

धावणे

फिट राहण्यासाठी धावणे आवश्यक असते असे अनिल कपूर यांनी व्यक्त केले. धावल्याने चयापचय पातळी जलद ठेवण्यास आणि स्नायूंना बळकट करण्याबरोबरच इतर अनेक फायदे होतात. अनिल कपूर अनेकदा त्याच्या इंस्टाग्रामवर स्प्रिंटिंगशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असतात.

पुरेशी झोप घेणे

'दिल धडकने दो' चित्रपटात काम केलेल्या अनिल कपूर यांच्या म्हणण्यानुसार, पुरेशी झोप घेणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे त दररोज 7 ते 8 तास झोप घेतात. याशिवाय ते स्मोकिंग आणि अल्कोहोल देखील टाळतात. सुट्ट्यांमध्ये किंवा शूटिंग दरम्यान ते फिटनेसचे नियम मोडत नाही आणि बाहेरचे पदार्थ खाणेही टाळतात.

डाएट प्लॅन

दिवसातून 1 किंवा 2 वेळा पोटभर जेवण घेण्याऐवजी अनिल कपूर 4 ते 6 वेळा थोडं-थोडं जेवण घेतात. त्यांच्या आहारात प्रथिने, कार्ब आणि हेल्दी फॅट्स भरपूर असतात. प्रथिनांसाठी मासे, अंडी, चिकन, प्रोटीन शेक आणि कडधान्ये तर कार्बसाठी त्याच्या आहारात केळी, ब्रोकोली, ओट्स, ब्राऊन राइस आणि बेरी यांचा समावेश असतो. हेल्ही फॅट्ससाठी ते ड्रायफ्रुट्स मिल्कशेक पितात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com