5 Tips For Happy Life: 'या' 5 गोष्टी वाढूव शकतात तुमचा हॅपीनेस

शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी आनंदी राहणे गरजेचे आहे.
5 Tips For Happy Life
5 Tips For Happy LifeDainik Gomantak
Published on
Updated on

Important Things to Increase Happiness in Life: सर्वांनाच आनंदी राहायला आवडते. आपण दु:खी व्हावे असे आपल्याला कधीच वाटत नाही. पण जीवनातील समस्यांमुळे आपण दुःखी राहतो.

घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमुळे आपण तणावाखाली येतो आणि छोट्या छोट्या गोष्टींचे टेंशन घेत असतो. आनंदी राहिल्याने आपले हृदय आणि मन दोन्ही निरोगी राहतात. चला तर मग जाणून घेउया आनंदी राहण्याचे महत्व काय आहे.

  • मजेशीर कथांचे वाचन करावे

स्टँडिंग कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना एकदा विचारण्यात आले होते की तुम्ही नेहमी आनंदी कसे असता? यावर उत्तर देत ते म्हणाले होते की, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी नेहमी हलके फुलके संवाद साधावा.

कधीही राग किंवा द्वेषाने बोलू नका. यामुळे मन उदास होईल. मन जड करणाऱ्या कथा वाचू नका किंवा टीव्हीवर पाहू नका. त्याऐवजी तुम्हाला आनंद देणाऱ्या, हसवणाऱ्या आणि गुदगुल्या करणाऱ्या कथा वाचा.

  • चांगली झोप गरजेची

निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्या शरीराचे तापमान कमी होते. कमी तापमानामुळे चांगली झोप येते. झोपण्यापूर्वी विशेषतः एलईडी बल्ब, घड्याळे, डिजिटल उपकरणे बंद करा. झोपण्यापूर्वी तळपायाला तेल लावल्यास चांगली झोप येते.

  • हेल्दी फूड खावे

मन लावून खाल्ल्याने आपला मेंदू आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात. पण मेंदूच्या पेशी आणि पचनसंस्था या दोन्हींवर भरपूर आणि जास्त तळलेले अन्न यांचा परिणाम होतो.

म्हणूनच इच्छा असूनही आपण आनंदी राहू शकत नाही. पोट आणि मेंदू यांच्यात योग्य संवाद होणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुमच्या आवडीचे पदार्थ खावेत.

5 Tips For Happy Life
Pineapple Juice in Summer: उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यात रोज प्यावा अननसाचा ज्यूस
  • ध्यान करावे

ध्यान केल्याने मन शांत होते आणि आनंदाची भावना निर्माण होते. ध्यान केल्याने मेंदू सक्रिय होतो. अस्वस्थ मन शांत होण्यास मदत मिळते. ध्यानमुळे चिंता आणि नैराश्य कमी होऊ शकते.

हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करेल आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल. म्हणूनच तुम्ही डोळे बंद करून 5 मिनिटे बसून सुरुवात करू शकता.

  • पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवावा

तुमच्याकडे असलेल्या सर्व पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवण्यासाठी वेळ काढा. त्यांची काळजी घ्या त्यांना तुमच्यासोबत फिरायला घेऊन जा. यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com