Hair Fall
Hair FallDainik Gomantak

Hair Fall: केस गळती होईल कमी, फक्त आहारात करा 'या' सुपचा समावेश

जर तुम्हालाही केसगळतीची समस्या असेल तर आहारात थोडा बदल करणे गरजेचे आहे.
Published on

Hair Fall: प्रत्येक महिलेला लांब आणि दाट केस हवे असतात. पण आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, प्रदूषण, हार्मोनल असंतुलन अशा अनेक कारणांमुळे केस गळतात. 

पोषक तत्वांची कमतरता असल्यामुळे केसांची वाढ होत नाही. केसांची वाढ आणि केस गळणे कमी करण्यासाठी केसांच्या मुळात मसाज करणे, स्वच्छ धुणे आणि हेअर मास्क लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आवश्यक पोषण आहारात समाविष्ट करणे अधिक महत्त्वाचे आहे. यामुळे केस गळणे कमी होईल. बीटचा आहारात समावेश केल्यास केसगळती कमी होईल.

केसांची वाढ होण्यासाठी आणि केस गळणे कमी करण्यासाठी बदाम उत्तम पर्याय आहेत. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक तत्व असतात. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक असते. हे केसांच्या वाढीसाठी देखील चांगले आहे.

सूर्यफुलाच्या बियांमध्ये सेलेनियम आणि बायोटिन असते. यामुळे केसगळती कमी होते आणि केस निरोगी होतात.

गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असते. केसगळती कमी करण्यासाठी केसांना नैसर्गिक वाढ आणि कंडिशनिंग करण्यासाठी फायदेशीर असते.

बीटमध्ये लोह, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात. याच्या कमतरतेमुळे केस गळतात. अशावेळी बीटरूट खाल्ल्याने या पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते आणि केस गळणे कमी होते .

Hair Fall
Home Vastu Tips: घरात रुद्राक्षाचे तोरण लावणे शुभ की अशुभ, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

सुप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • गाजर - 1

  • बीट - 1

  • आलं - एक तुकडा

  • काळी मिरी - एक चिमूटभर

  • मीठ - एक चिमूटभर

  • भोपळ्याच्या बिया - 1 टीस्पून

  • सूर्यफूलाच्या बिया - 1 टीस्पून

  • भिजवलेले बदाम - 5 

सुप बनवण्यासाठी कृती

  • कुकरमध्ये पाणी घ्यावे.

  • त्यात भाज्या आणि आलं घालून शिजवावे.

  • आता त्यात मीठ आणि काळी मिरी घालावे.

  • तुमचे हेल्दी सूप तयार आहे.

  • बदाम आणि बियांनी सजवून सेवन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com