Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार जीवनात सुख, समृद्धी आणि शांतीसाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास वास्तू दोष निर्माण होतात. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
प्रत्येक व्यक्तीच्या घराच्या दारावर कोणत्या ना कोणत्या साहित्याने बनवलेले तोरण लावलेले असते. ज्याचे वेगळे महत्त्व असते. काही जण आंब्याच्या पानांचे तोरण लावतात, काही फुलांचे तोरण लावता, तर काही रुद्राक्षाचे तोरण लावतात. हे तोरण लावताना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
घराच्या दारावर रुद्राक्ष तोरण ठेवणे खूप शुभ मानले जाते. हे घरामध्ये लावल्याने नकारात्मक शक्ती कधीही प्रवेश करत नाहीत आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही.
घराच्या दारावर रुद्राक्ष तोरण लावल्याने व्यक्तीला सुख, शांती आणि समृद्धी मिळू शकते आणि धनाची प्राप्ती होते.
वास्तु शास्त्रानुसार घराच्या दारावर रुद्राक्ष तोरण लावल्याने व्यक्तीला मान-सन्मान मिळतो. यामुळे सूर्यदेवाची कृपाही कायम तुमच्यावर राहते.
कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी असल्यास रुद्राक्ष तोरण लावावे. यामुळे व्यक्तीचे आरोग्य सुधारू शकते आणि शुभ परिणाम मिळू शकतात.
हिंदू धर्मात भगवान शंकराला रुद्राक्ष अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे जर तुम्ही रुद्राक्षाचे तोरण लावले तर एकमुखी रुद्राक्ष नवडावे. असे केल्याने व्यक्तीला सर्व पाप आणि चिंतांपासून मुक्ती मिळते. तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते.
रुद्राक्ष तोरण लावत असाल तर त्या कोणत्याहे फुल असले तरी चालेल. यामुळे घरात सर्व देवी-देवता येतात आणि सौभाग्यही प्राप्त होते.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.