Good Habits: 'या' 6 सवयींमुळे आजारपण होईल दूर

तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर लाइफस्टाइलमध्ये बदल करावे लागतील.
Healthy Food
Healthy FoodDainik Gomantak

Good Habits For Healthy Life: आजारी पडल्यावर लोक अनेकदा डॉक्टरांकडे जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की लोक त्यांच्या निष्काळजीपणामुळे आजारी पडतात.  रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे अनेक आजार रोग शरीरावर आक्रमण करतात.

जर तुम्हाला निरोगी आणि चांगले आयुष्य जगायचे असेल आणि सारखे आजारी पडू नये असे वाटत असेल तर तुम्हाला शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आणि चांगली बनवावी लागेल. 

तुमच्या लाइफस्टाइळमध्ये कोणत्या सवयींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल हे जाणून घेऊया.

  • व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचे सेवन

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यात व्हिटॅमिन सी मदत करते. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत राहते आणि बाहेरील बॅक्टेरिया शरीरावर आक्रमण करत राहतात. यासाठी आपल्या दैनंदिन आहारात संत्री, लिंबू, आवळा, अननस, फ्लॉवर, कोबी आणि रताळे यासारख्या जीवनसत्त्व सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.  

  • रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा काढा

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हर्बल ज्यूस किंवा काढा पिऊ शकता. हळद, आवळा आणि आले यांच्या रसात खूप शक्ती असते. यासाठी ताजी हळद आणि आले मिक्स करावे. नंतर त्याचा रस काढून त्यात काळे मीठ आणि काळी मिरी टाकून रोज प्यायल्यास खूप फायदा होईल. 

  •  मुळा खावा

हिवाळा येताच जर तुम्ही मुळा खाण्यास सुरुवात केली तर तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल. नाक बंद होणे, सायनस, मायग्रेन इत्यादी समस्यांनी ग्रस्त असलेल्यांना मुळ्याचा रस पिल्याने खूप फायदा होतो. 

  • आलं आणि लसूण

तुमच्या दैनंदिन आहारात लसूण आणि आलं यांसारखे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारे पदार्थ असलेच पाहिजे. रोज सेवन केल्याने तुमचे शरीर बाह्य रोगांशी लढण्यासाठी मजबूत होईल. या दोन्ही गोष्टी तुम्ही भाज्यांमध्ये घालू शकता. तुम्ही लसूण कच्चा देखील खाऊ शकता.

  • पालेभाज्या

 पालक, बाजरी, गाजर आणि ब्रोकोली यांसारखे पदार्थही तुमच्या शरीराला खूप ताकद देतात. शिवाय सूर्यफुलाच्या बिया, सब्जा बिया इत्यादी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या बियांचा आहारात समावेश केल्याने तुमचे शरीर निरोगी राहते.

  • योगा

नियमितपणे योगा करणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असते. योगा केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. तसेच शरीर लवचिक बनते.यामुळे अनेक आजार दूर राहतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com