मशरूम खाल्याने नैराश्य-नकारात्मक विचार होते दूर

नव्या अभ्यासानुसार असा दावा करण्यात आलेला आहे की मशरूम खाल्याने नैराश्य दूर होते.
Mushroom
MushroomDainik Gomantak
Published on
Mushroom
MushroomDainik Gomantak

मॅजिक मशरूममध्ये (Mushroom) हॅलुसिनोजेनिक पदार्थ असतो, जो मेंदूला हायपर-कनेक्टेड ब्रेन बनण्यास मदत करतो. याद्वारे तुम्ही डिप्रेशनवरही उपचार करू शकता. एका नव्या अभ्यासावरुन हा दावा करण्यात आला आहे. हे मशरूम मेंदूचे वेगवेगळे भाग जोडण्यास मदत करते. त्यातील सायकेडेलिक पदार्थ नैराश्याला दूर करण्यास मदत करते.

Mushroom
MushroomDainik Gomantak

मॅजिक मशरूमबाबत अलीकडेच क्लिनिकल चाचण्या झाल्या आहेत. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की मॅजिक मशरूममधील हॅलुसिनोजेनिक पदार्थ म्हणजेच सायलोसायबिन मेंदूला अॅक्टिव करतो.तसेच नकारात्मक विचार डोक्यात येताच, दूर करून मन शांत ठेवण्यास मदत करतो.

Mushroom
MushroomDainik Gomantak

मानसिक आरोग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सायलोसायबिनद्वारे नैराश्य, मूड स्विंग इत्यादींवर उपचार केले जाऊ शकतात असा अंदाज आहे. हा अभ्यास नुकताच नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे. सायलोसायबिनसारखे सायकेडेलिक पदार्थ डिप्रेशनचे लक्षणे कमी करण्यास मदत करते.

Mushroom
MushroomDainik Gomantak

सायलोसायबिनचा प्रभाव समजून घेण्यासाठी, शास्त्रज्ञांनी क्लिनिकल चाचण्यांमध्ये 60 रुग्णांचा समावेश केला. प्रत्येक रुग्णाच्या मेंदूवर वेगवेगळा परिणाम झाला. सायलोसायबिन घेतल्यानंतर या सर्व रुग्णांचे मेंदू अधिक सक्रिय झाले. इम्पीरियल कॉलेज लंडनमधील डॉक्टरेटचे विद्यार्थी रिचर्ड डॉस यांनी सांगितले की, आम्ही क्लिनिकल ट्रायल्समध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये मेंदूचे वेगवेगळे भाग सक्रिय आणि एकमेकांशी जोडलेले पाहिले.

Mushroom
MushroomDainik Gomantak

रिचर्ड डॉस यांनी सांगितले की, 60 लोकांमध्ये निरोगी लोक आणि अस्वस्थ लोकांचा समावेश होता. सायलोसायबिनने निरोगी लोकांचे मेंदू हायपर-कनेक्टेड मेंदू बनवले. मात्र डिप्रेशनने त्रस्त असलेल्यांना यातून बाहेर काढता आले. त्यांचे मनही अधिक प्रसन्न झाले. नैराश्य असलेल्या लोकांच्या मेंदूमध्ये नैराश्यक चाचण्यांमध्ये नकारात्मक विचार येणे थांबले. याचा अर्थ सायलोसायबिन मेंदूला सक्रिय करते.

Mushroom
MushroomDainik Gomantak

यूसी सॅन डिएगो स्कूल ऑफ मेडिसिन येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हेवा आर्टिन यांनी सांगितले की, या अभ्यासातून हे स्पष्टपणे दिसून आले आहे की मॅजिक मशरूम नैराश्यावर उपचार करू शकते. जर सायलोसायबिन मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना सक्रियपणे जोडत असेल, तर एखाद्याला मानसिक वेदनांमधून बाहेर काढण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com