Remedies For Headache:- सध्याच्या धावपळीच्या जगात डोकेदुखी सामान्य झालेली आहे. ब-याच वेळा डोकेदुखीमागे निश्चित ठोस आजार नसतो. आपल्या सभोवतालची अनेक कारणं यामागे असू शकतात.
जसं कि, मानसिक ताण, भूक, उपासमार, गोंगाट, अपुरी झोप, कामाचा व्याप, वातावरणातील बदल, अपचन, बध्दकोष्ठता..या सर्व गोष्टींमुळे डोकेदुखी अगदी वरचेवर झालेली आहे.
डोकेदुखी कमी करण्यासाठी पेनकिलर घेण्याकडे बऱ्याच लोकांचा कल असतो. अलोपॅथी औषधांमुळे तात्पुरता आराम मिळतो. मात्र आपल्याला परवडतील आणि सहज शक्य असतील असे अनेक उपाय आहेत ज्यांनी तुम्ही तुमची डोकेदुखी दूर करू शकता.
त्यासाठी तुम्हाला ठराविक पद्धतीने तुमची दिनचर्या आखावी लागेल. यासाठी तुम्ही लगतच्या आयुर्वेदिक वैद्यांची देखील मदत घेऊ शकता.
सर्वसाधारणपणे दिनचर्या खालील प्रमाणे असावी:-
• रोज सकाळी उठण्याची वेळ ठरवावी
• रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे.
• फ्रेश झाल्यावर अनुलोम-विलोम प्राणायाम, उष्णतेचा त्रास असल्यास शितली व सीत्कारी प्राणायाम करावा. तसेच वैद्यांच्या सल्ल्याने आसनं करण्याचा प्रयत्न करावा
• संध्याकाळी लवकर म्हणजे सात ते साडे सात वाजेपर्यंत जवण.
• आठवड्यातून किमान दोन वेळा पादाभ्यंग करावं. यासाठी तुम्ही तळपायांना मालिश करण्यासाठी साजूक तूप किंवा तीळ तेल, खोबरेल तेल वापरू शकता करणे.
• रात्री झोपताना नाकात साजूक तूपाचे दोन दोन थेंब सोडावेत
• वरील बदल करूनही डोकेदुखी थांबत नसल्यास वैद्याच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करणे.
आयुर्वेद चिकित्सालयात काही विशेष चिकित्सा उपक्रम केले जातात. वारंवार व तीव्र डोकेदुखी असल्यास हे उपचार अत्यंत प्रभावी ठरतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.