हस्त कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृतीला आता मिळणार 'न्याय'

कुशल कुंभार जेव्हा आपल्या हातांनी मातीवर आपल्या कल्पकतेने संस्कार करत असतो तेव्हा त्या निर्मितीत त्याच्या व्यक्तिगत प्रतिभेचे कणही चमचमत असतात.
Goa handicrafts will now get 'justice'
Goa handicrafts will now get 'justice' Dainik Gomantak
Published on
Updated on

त्तिका-कला (पॉटरी) ही हस्त कौशल्याची (Art) राज्ञी आहे. सुशोभित आणि चमकदार सिरॅमिक भांडी घरात मिरवतातच पण हाताने तयार केलेल्या मातीच्या भांड्यांचे कौतुक (Goa Handicrafts) हे अधिक जिव्हाळ्याचे असते. कुशल कुंभार जेव्हा आपल्या हातांनी मातीवर आपल्या कल्पकतेने संस्कार करत असतो तेव्हा त्या निर्मितीत त्याच्या व्यक्तिगत प्रतिभेचे कणही चमचमत असतात.

Goa handicrafts will now get 'justice'
गोव्यात दिवाळीत फराळापेक्षा पोह्यांना मोठं महत्त्व

मृत्तिकाकलेतून आकार घेतलेली उत्तम दर्जाची निर्मिती ही अलीकडे बहुदा उच्चभ्रू दुकानांमधूनच उपलब्ध असते. त्यावरचा न परवडणारा प्राईस टॅग आपल्याला त्या साऱ्या निर्मिती दुर्लभ करून टाकतो.

‘पाॅटर्स फेस्त गोवा’ हस्त कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती एका विशेष पाॅटरी मार्केटद्वारा आपल्यासाठी घेऊन येत आहे. पाॅटरी मार्केटची ही गोव्यात आयोजित होणारी ही पहिलीच आवृत्ती असेल. वेगवेगळ्या तंत्रामधून साकार झालेल्या मातीच्या कलाकृती आपल्याला ह्या पाॅटरी मार्केटमध्ये आकर्षित करतील.‘पॅशिओ आर्पोरा’ येथे 12 ते 14 नोव्हेंबर या तीन दिवसात आयोजित होणाऱ्या ‘पाॅटर्स फेस्त गोवा’ मध्ये भारतभरातून 34 मृत्तिकाकलेचे कलाकार सिरॅमिक आणि हातांनी घडवलेल्या आपल्या मातीच्या कलाकृती मांडणार आहेत. बिपाशा सेनगुप्ता यांनी या प्रदर्शनाचे आयोजन गोव्यात प्रथमच घडवून आणले आहे. त्या म्हणतात, कुंभार कामाच्या या दुर्मिळ होत चाललेल्या कलेला पुन्हा पुनर्जीवित करणे महत्त्वाचे आहे.

Goa handicrafts will now get 'justice'
‘ते’ कोण हे सांगणारे ‘प्रेरणा रुख’

ज्यायोगे ही कला आणि त्यातील कलाकृती आर्थिकदृष्ट्या पुन्हा सामान्य माणसांच्या आवाक्यात येतील. या कुंभार कामाच्या अभिनव फेस्तात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, भोपाळ, कलकत्ता. आग्रा, इंदोर, पुणे, बेंगलोर इथले कलाकार भाग घेणार आहेत. यात पारंपरिक कलाकार माती हे माध्यम आपल्या कामासाठी वापरतात तर स्टुडिओ कलाकार पोर्सेलिनवर काम करतात.

अलीकडच्या काळात लोकांचे लक्ष प्लास्टिकसारख्या घातक घटकांवरून उडून पुन्हा माती किंवा इतर नैसर्गिक घटकांकडे वळत आहे. त्या दृष्टीने मातीवर अधिकाधिक प्रयोगही होत आहेत. या या माध्यमाबद्दल वाढलेल्या औत्सुक्यामुळे पारंपारिक कुंभार कामांनाही तेजी आली आहे. प्रायोगिक मृत्तिकाकला तर चित्रकारितेलाही आपल्यात सामावून घेते. शांतिनिकेतन मधले कलाकार मातीच्या शिल्पकामात कुशल आहेत, बेंगलोर आणि पुडुचेरीच्या कुंभार कामात रंगांच्या सौम्य छटा असतात, दिल्लीची निळी पाॅटरी वेगळ्या तऱ्हेने आकर्षक भासते.

मृत्तिका कलेने अनेक क्षेत्रातल्या लोकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. अनेक नामांकित सॉफ्टवेअर इंजिनियर, डिझायनर यांनी आपापल्या व्यवसायाकडे पाठ फिरवून मोहवणाऱ्या या क्षेत्रात स्वतःचा शिरकाव करून घेतला आहे. अशा अनेक कलाकारांचे प्रात्यक्षिक या ‘पाॅटर्स फेस्त गोवा’मध्ये आपल्याला अनुभवता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com