लोकांचा विश्‍वास : व्यवसायाचे गमक

लोकांनी तिच्या ‘महालसा प्रॉडक्टस’प्रती दाखवलेला विश्र्वास आहे असे उमाला वाटते.
Goa Famous Mahalasa Products
Goa Famous Mahalasa ProductsDainik Gomantak
Published on
Updated on

2000 सालापासून उमाने प्रायोगिक तत्त्वावर फराळ व इतर खाद्यपदार्थ तयार करून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. तिने तयार केलेले खाद्यपदार्थ लोकांच्या पसंतीस उतरले. उमा सांगते, खाद्यपदार्थ तयार करताना ती प्रथम लोकांच्या आरोग्याचा विचार करते. पदार्थांचा दर्जा सांभाळून लोकांच्या खिशाला परवडेल  अशीच ती प्रत्येक पदार्थाची  किंमत ठरवते. एकदा तिच्याकडे खाद्य पदार्थ विकत घेतलेली व्यक्ती परत येणार याचा कटाक्ष ती बाळगते.

यंदा कोविडमुळे चतुर्थीच्या व दिवाळीच्या सणाला लोकांचा प्रतिसाद कमी असेल असे उमाला वाटले होते. पण तसे न होता उलट तिच्याकडच्या ऑर्डर्स वाढलेल्या आहेत. हा लोकांनी तिच्या ‘महालसा प्रॉडक्टस’प्रती दाखवलेला विश्र्वास आहे असे उमाला वाटते.

Goa Famous Mahalasa Products
स्वादिष्ट, रुचकर गावठी पोहे

उमा पूर्वाश्रमीची म्हार्दोळ येथली. लहानपणापासून घरांत वेगवेगळ्या पाककृती तयार करण्याची तिला खूप आवड. घरात सहल वगैरे असेल तर सर्व जेवण तीच बनवायची. त्यामुळे सुदेश मळकर्णेकर यांच्याबरोबर विवाह झाल्यावर हा व्यवसाय सुरू करण्यास तिला कठीण वाटले नाही. आपल्या सासुरवाडी, मडगावी सुरुवातीला ती पतीला स्टेशनरी व पुस्तकांच्या दुकानात मदत करायची. आता तिच्या या व्यवसायाला पती व मुलांचे पूर्ण सहकार्य लाभते.

लोकांचा उपवास किंवा ते जेव्हा शाकाहारी असतात तेव्हा ऑर्डर्स ‘महालसा..’कडेच येतात. तिच्याकडे शुद्ध शाकाहारी पदार्थ मिळतील असा लोकांचा तिच्यावर विश्र्वास आहे. त्यावेळी उमा सारे वेगळे बनवते. आपण तयार केलेले फराळ व खाद्यपदार्थ केवळ गोव्यातच नव्हे तर मुंबई, पुणे, दुबई येथेसुद्धा लोकांच्या पसंतीस उतरल्याचे तिने अभिमानाने सांगितले.

दिवाळीसाठी तिने 50 ते 60 प्रकारचे वेगवेगळे जिन्नस तयार केले आहेत. शिवाय गोव्यात ‘वजे’ पाठविण्याची प्रथा आहे. त्यासाठी तिने खास हॅम्पर तयार केला असून त्यात 15 ते 20 प्रकारच्या पदार्थांचा समावेश आहे. त्यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे तिने सांगितले. गोव्यात दिवाळीला प्रत्येकाच्या घरी पोह्याचे वेगवेगळे जिन्नस करतात. उमानेही पोह्यांचे तिखट व गोड पदार्थ तयार केले आहेत व लोकांच्या ते पसंतीस उतरत आहेत.

Goa Famous Mahalasa Products
‘पोर्ट्रेट आणि फॅशन’ फोटोग्राफी कार्यशाळा

एखादा व्यवसाय सुरू करणे, खासकरून महिलांसाठी, पुष्कळ कठीण असते. केंद्र सरकारने जी आत्मनिर्भरतेची योजना सुरू केली आहे त्याचा अनेक युवा युवतींना फायदाच होणार आहे. नोकरीच्या शोधापेक्षा स्वतःचा व्यवसाय हा कधीही फायदेशीर असतो. येथे स्वतःला स्वतंत्रपणे, कुणाच्याही दडपणाशिवाय आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी असते. शिवाय तुमच्या हाताखाली आणखी काहीजणांना रोजगार मिळतो. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो हे पाहून मन प्रसन्न व समाधानी होते असेही उमाने सांगितले. उमा ही आत्मनिर्भरतेचे एक अस्सल व चमकदार उदाहरण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com