‘पोर्ट्रेट आणि फॅशन’ फोटोग्राफी कार्यशाळा

फोटोग्राफी क्षेत्रात प्रसाद पानकर हे नाव आता गोव्यात सुपरिचित झाले आहे.
Prasad Pankar
Prasad PankarInsta/ prasad_pankar
Published on
Updated on

फोटोग्राफी क्षेत्रात प्रसाद पानकर (Prasad Pankar) हे नाव आता गोव्यात सुपरिचित झाले आहे. त्याच्या हाताखाली प्रशिक्षण घेतलेल्या काही छायाचित्रकारांनी तर फोटोग्राफी हे आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोग्राफीच्या कार्यशाळा प्रसाद सातत्याने घेत असतो.

‘पोर्ट्रेट आणि फॅशन’ या विषयावरची त्यांची कार्यशाळा 11 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या कार्यशाळेची वाट फोटोग्राफीच्या क्षेत्रातली हौशी मंडळी उत्सुकतेने पाहत असतात. फक्त गोव्यातील नव्हे तर देशातल्या इतर राज्यातील हौशी छायाचित्रकारांनी या कार्यशाळेला आतापर्यंत हजेरी लावली आहे. 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर असे चार दिवस चालणाऱ्या यंदाच्या या कार्यशाळेतदेखील इंदोर, हुबळी येथील इच्छुकांनी आपली नावे नोंदवली आहेत. या कार्यशाळेत या अभ्यासक्रमाची रचना अशाप्रकारे केली गेली आहे की या कार्यशाळेत प्रशिक्षित झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना ‘फॅशन फोटोग्राफी डिप्लोमा कोर्स’मध्ये पुढील शिक्षण घेणे सुलभ होईल. शिवाय ही कार्यशाळा स्वतःचा स्टुडिओ असणाऱ्यां छायाचित्रकाराना देखील उपयोगी होऊ शकेल.

Prasad Pankar
रंगला आगळावेगळा फॅशन शो

फॅशन फोटोग्राफीसाठी आणि स्टुडीओसाठी आवश्यक असलेल्या साधनांचा परिचय या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थ्यांना करून दिला जाईल. स्वतःच्या घरात देखील फोटोग्राफी स्टुडिओ उभारणे कसे शक्य आहे याची माहिती या कार्यशाळेतून प्रशिक्षणार्थ्यांना होईल. इनडोर आणि आउटडोर प्रकाश योजनेच्या होणाऱ्या अभ्यासातून प्रशिक्षणार्थी स्वतंत्रपणे काम करू शकतील. पहिल्या दिवशी फोटोग्राफीचा थिएरी भाग पार पडल्यानंतर या कार्यशाळेचे उरलेले तीनही दिवस प्रशिक्षणार्थीना प्रात्यक्षिकाद्वारे शिकवले जाईल. नैसर्गिक प्रकाशाच्या उपयोगापासून ते स्टुडिओ लाइट्स कसे वापरावे याची माहिती या कार्यशाळेत होईल.

Prasad Pankar
स्वादिष्ट, रुचकर गावठी पोहे

ही कार्यशाळा आटोपल्यानंतर प्रसाद हौशी छायाचित्रकारांसाठी ‘टेबलटॉप आणि जाहिरात फोटोग्राफी’ या विषयावरची कार्यशाळा 15 नोव्हेंबरपासून घेणार आहे. ही कार्यशाळादेखील चार दिवसांची असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com