यंदा अनेक स्थलांतरीत पक्ष्यांनी गोव्याकडे फिरवली पाठ..!

‘युरोपीयन रोलर’ हा पक्षी जो गोव्यात ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळात दिसतो तो सबंध वर्षभर दिसलाच नाही..
Goa Environment
Goa EnvironmentDainik Gomantak

Goa Environment : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात गोव्याच्या (Goa) आकाशात पक्ष्यांची भिरी उडताना दिसण्याचे दृश्‍य काही अनोळखी नाही. त्यांच्या कसरतीनी आकाश वेग- वेगळ्या वळणांनी वाकत असते. एखाद्या शास्त्रीय संगीत गाणारा गायक रियाझाला बसला आहे आणि आपल्या आलापीने, स्वरांचे हेलकावे तो आकाशात मांडत चालला आहे अशा आभासाचे काहीसे ते दृश्‍य असते. कधी द्रुत, कधी विलंबीत, कधी सरळ, कधी तीव्र वळणांनी आकाशातली ही भिरी आपली सम गाठत राहतात आणि सकाळ- संध्याकाळच्या रागांनी आकाशातली आपली मैफल संपन्न करतात.

Goa Environment
फिजिकल ते डिजिटल आणि बोध

पण हे दृश्‍य यंदाच्या ह्या मोसमात मात्र काहीसे दुर्मिळ झाले आहे. काय असेल कारण? 2019 च्या मोसमात देखील असेच काहीसे झाले होते. आणि त्यावेळी कारण असे मांडण्यात आले होते की गोव्यात मान्सून लांबल्यामुळे स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांनी (Migratory birds) आपली ही वाट चुकवली आहे. त्यावेळी ‘युरोपीयन रोलर’ हा पक्षी जो गोव्यात ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळात दिसतो तो संबंध वर्षभर दिसला नव्हता. जे स्थलांतरीत पक्षी त्या काळात गोव्यात आढळले ते इतर वर्षांच्या तुलनेत कमीच होते.

गोव्याची पाणथळ जागा ही या पक्ष्यांचे गोव्यातले मुख्य घर असते. गोव्यात जवळ-जवळ वीस अशा महत्वाच्या पाणथळ जागा आहेत जिथे पक्षी हजारो मैलांचे अंतर कापून येतात. सारा हिवाळा ते जागेत मनसोक्त विहार करतात. पावसाळा कमी झाल्यानंतर या पाणथळ जागेतले पाणी उतरते आणि मग त्यातल्या कीटकादी अन्नावर हे पक्षी आपली गुजराण करतात. २०१९ सालच्या सारखा यंदाही पाऊस लांबलेला आहे. स्थलांतरीत पक्ष्यांचा पिढीजाद निवास असणाऱ्या पाणथळ जागेत पाणी अजून वरच्या पातळीवर आहे. ‘पिनटेल’ किंवा ‘शोव्हलर’ सारखी स्थलांतर करणारी बदके (डक) ही पाण्याच्या वरच्या स्तरावरचेच अन्न खाऊ शकतात. आपल्या अन्नाच्या शोधार्थ ती खोल पाण्यात बुडी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा पक्ष्यांना उतरलेल्या पातळीच्याच पाणथळ जागा आपल्या इथल्या दिर्घ काळच्या उपजिवीकेसाठी आवश्‍यक असतात. शिवाय पाण्याच्या विशिष्ट स्थितीमुळेही पाण्यात किटक आणि वनस्पती वाढतात. बदलेल्या निसर्गचक्रामुळे ह्या प्रकियेतही खंड पडतो आणि त्याचा परिणाम पक्ष्यांच्या आगमनावर होतो.

Goa Environment
Weight Loss: हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी 'या' 5 टिप्स जाणून घ्या

गोव्यात पक्ष्यांचे तीन प्रकारचे स्थलांतर घडते. एक स्थानिक स्थलांतर, दोन टप्पा (पॅसेज) स्थलांतर आणि तिसरे दिर्घ अंतर स्थलांतर. ‘ब्लॅक काईट’, बाईट इंडीयन गोल्डन ओरीओल किंवा देखणा ‘पॅराडायज प्लायकॅचर’ हे पक्षी पावसाळ्यात गोव्यातून साधारण कोरड्या प्रदेशात निघून जातात व पावसाळा आटोपल्यावर पुन्हा गोव्यात परतात. ‘आमुर फाल्कन’ आणि ‘युरोपियन रोलर’ सारखे पक्षी गोव्यात एक छोटासा काळ घालवतात आणि नंतर ते पुढे दक्षिणेकडे जायला निघतात. गोवा त्यांच्यासाठी एक टप्पा असतो. ‘रुडी शेलडक’ किंवा ‘युरोशियन मार्श हॅरियर’ हे संपूर्ण हिवाळा गोव्यात घालवतात.

गोव्याच्या निसर्गात मानवी हस्तक्षेप अलिकडच्या काळात फार वाढल्यामुळेही पक्ष्यांच्या स्थलांतरवर परिणाम घडून आलेला आहे. एकेकाळी करमळीचे तळे हे हजारो पक्ष्यांना कवेत घेऊन किलबीलत असायचे. मात्र गेल्या काही वर्षात त्या तळ्यात आसरा घेणाऱ्या पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे. त्यामानाने दक्षिण गोव्यातल्या मायणा, कुडतरी येथील तळ्याची स्थिती खुपच समाधानकारक आहे. अजूनही तिथे पक्षी चांगल्या संख्येने येतात.

‘मृगया एस्पेडिशन’ ही संस्था गोव्यात पक्षी निरीक्षण मोहीमा आयोजित करते ह्या संस्थेसाठी काम करणारे गजानन शेट्ये म्हणतात गोव्याच्या पश्‍चिम घाटात अजूनतरी स्थिती समाधानकारक आहे. काही पाणथळ जागांवर पक्षी यायला सुरुवातही झाली आहे. त्यांच्या पक्षी निरीक्षण मोहीमांना सुरुवात झाली आहे आणि पर्यटकांचाही समाधानकारक प्रतिसाद लाभतो आहे.

या बदलणाऱ्या निसर्गचक्रामुळे काही अनपेक्षित पक्षी गोव्यात आढळले आहेत. ‘लाँग-बीलड डोविचर’ आणि ‘आफ्रिकन ओपनबील’ तर भारतात प्रथमच आढळलेला आहे. काही पक्षी विपुल संख्येने आले आहेत तर काहींची वानवा आहे. काहीचे आगमन तर ठरावीक वेळेपेक्षा लवकर झालेले आहे तर काहीचे फार उशिरा.

- गजानन शेट्ये, मृगया एस्पेडिशन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com