या देशातील मुलीला मिळाले 3D प्रिंटेड कान, जगातील पहिली ट्रांसप्लांट शस्त्रक्रिया

म्हणून अलेक्साने आपल्या कानाचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला
ear
ear Dainik Gomantak
Published on
Updated on

मेक्सिको: 3D-प्रिंट तंत्रज्ञानाचा वापर करून कान प्रत्यारोपण करणारी 20 वर्षीय मेक्सिकन मुलगी जगातील पहिली रुग्ण ठरली आहे. मेक्सिको सिटीची रहिवासी असलेल्या अलेक्साचा जन्म तेव्हा तिच्यासोबत मायक्रोटिया आजारही जन्माला आला. हा एक दुर्मिळ जन्म दोष आहे, ज्यामुळे कानाचा बाह्य भाग लहान आणि चुकीचा आकारचा दिसतो. पुढे जाऊन यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळेच अलेक्साने आपल्या कानाचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला होता. (3D printed ear world first transplant surgery)

सॅन अँटोनियो येथील बालरोग कान ट्रांसप्लांट विभागातील सर्जन डॉ. आर्टुरो बोनिला यांनी मुलीच्या मायक्रोटिया कानाच्या अवशेषांमधून अर्धा ग्रॅम कार्टिलेट काढून शस्त्रक्रिया केली. त्यानंतर ते 3D स्कॅनसह क्वीन्समधील लॉंग आयलँड सिटी येथील 3DBio थेरप्युटिक्सला पाठवण्यात आले. तेथे पेशींना जोडून मुलीसाठी थ्रीडी प्रिंटेड कान तयार करण्यात आला.

ear
World Bicycle Day: सायकलिंग वाहतुकीचे सर्वात स्वस्त आणि आरोग्यासाठी मस्त साधन

हे एका खास 3D बायो-प्रिंटरमध्ये सिरिंजसह घातले गेले. नंतर ते लहान आयताकृती आकारात कमी केले गेले, जे रुग्णाच्या निरोगी कानाच्या मिरर इमेजची कॉपी होती. संपूर्ण प्रिंटिंग प्रक्रियेस 10 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला.

प्रिंटिंग कानाचा आकार थंड पिशवीत टाकला आणि डॉक्टर बोनिलाकडे पाठवण्यात आला. डॉक्टरने हा कान अलेक्साच्या जबड्याच्या अगदी वर त्वचेखाली ठेवला. इम्प्लांटच्या सभोवतालची त्वचा घट्ट केल्यानंतर, येथे कानाचा आकार तयार होतो.

ear
Health Tips: अल्सरवर 5 घरगुती उपाय नक्की ट्राय करा

जेव्हा ती किशोरवयीन झाली तेव्हा अलेक्साने सांगितले. अशा परिस्थितीत, तिला तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अधिक जागरूक राहण्याची सवय लागली होती. आत्तापर्यंत ती तिचे केस लांब आणि सैल पोनीटेलमध्ये ठेवून कान झाकण्याचा प्रयत्न करत होती. पण, या प्रत्यारोपणानंतर ती आता पोनीटेल किंवा केसांची कोणतीही स्टाईल करू शकणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com