Garlic Tea: सर्दी खोकल्याला पळवणारा अन् मधुमेहींसाठी फायदेशीर चहा

Garlic Tea: त्यामुळे हा चहा वेगवेगळ्या आजार असलेल्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर ठरु शकतो.
Garlic
Garlic Dainik Gomantak
Published on
Updated on

Garlic Tea: तुम्ही आत्तापर्यंत अनेकप्रकारचे चहा पाहिले असतील आणि त्याचे सेवनही केले असेल. मात्र तुम्ही कधी लसणाचा चहा पिला आहे का?

चहा अनेकांच्या दैनंदीन जीवनाचा अविभाज्य भाग असतो. काहींना चहा पिल्याशिवाय दिवस पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. मात्र बहुतेकजणांना चहाचे व्यसन असते. त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. असे होऊ नये यासाठी विविधप्रकारे चहा बनवता येतो. किंबहुना अनेक चहाचे प्रकार आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आज आपण लसणाच्या चहाचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते पाहणार आहोत.

लसणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असलेले अनेक गुणधर्म आहेत. त्यामुळे हा चहा वेगवेगळ्या आजार असलेल्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर ठरु शकतो.

१. मधुमेह असलेल्यांसाठी हा चहा उत्तम मानला जातो. या चहाचे सेवन केल्यास ब्लड शुगर लेव्हल कमी होते.

२. लसणाचा चहा तुमची चयापचायाची शक्ती वाढवतो. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

३. जर तुमच्या शरीरावर सूज असेल तर लसणाचा चहा ही सूज कमी होण्यास मदत होते.

४. अँटीबायोटिक पेय म्हणून देखील या चहाचे सेवन केले जाते. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते.

Garlic
Vastu Tips: महिलांनी किचनमध्ये 'या' 5 गोष्टींची काळजी घेतल्यास दूर होतील आर्थिक समस्या

५. तुम्हाला जर श्वसनाचा त्रास होत असेल तर तुमच्यासाठी हा चहा फायदेशीर आहे.

६. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून सुटका होण्यासदेखील हा लसणाचा चहा मदत करते.

असा बनवा लसणाचा चहा

एक कप उकळलेल्या पाण्यात बारिक कुटलेला लसूण घालावा. यामध्ये तुम्ही काळी मिरी, आलं आणि दालचिनी देखील घालू शकता. परंतु तुम्ही एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरु नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com