
Vastu Tips: वास्तुशास्त्रात समस्यांसाठी अनेक उपाय सांगितलेले आहे. घर बांधताना किचनची योग्य दिशा ठरवावी. कारण घराची वास्तु बरोबर नसेल तर घरात अशांतता निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार महिलांनी स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास आर्थिस समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
स्वयंपाक बनवण्यासाठी शुभ दिशा
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक करताना तोंड पुर्वेकडे असावे. कारण पुर्व दिशा ही सुर्याची दिशा मानली जाते. या दिशेला सुर्यप्रकाश सर्वात जास्त वेगाने पसरतो असे मानले जाते. तसेच सकारात्मक ऊर्जा संचार करते.
ही दिशा अशुभ मानली जाते
वास्तुनुसार पश्चिम दक्षिण आणि उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक बनवू नका. असे केल्याने घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे स्वयंपाक बनवताना कोणत्या दिशेला तोंड करावे याची काळजी घ्यावी.
दक्षिण दिशेला तोंड करू नये
वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करू नये. असे केल्याने कुटूंबातील सदस्यांच्या जीवनात गरिबी येऊ शकते. तसेच या दिशेला उभे राहून जेवण बनवल्यास डोकेदुखी, सांधेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
स्वयंपाक करताना मनात चांगले विचार आणावे
आपण जे पदार्थ खातो त्याचा परिणाम आरोग्यावर देखील होतो. यामुळे स्वयंपाक करताना मनात चांगले विचार आणावे. कारण स्वयंपाक करताना ज्या भावना असतात त्या पदार्थांमध्ये उतरतात. यामुळे वास्तुनुसार स्वयंपाक करताना मनात चांगले विचार करावे.
ही चूक करू नका
किचन ने हमी स्वच्छ ठेवावे. याचा आरोग्यासह सुख-समृद्धीवर देखील याचा चांगला परिणाम होतो. यामुळे स्वयंपाक झाल्यावर नेहमी ओटा स्वच्छ करावा.
या गोष्टींचीही घ्यावी काळजी
मुख्य दारातून किचनमधला गॅस दिसू नये. किचन शौचालय किंवा पायऱ्यांच्या खाली नसावे याची काळजी घ्यावी. असे केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.