Garlic Tea: हृदयविकारांवर लसणाचा चहा रामबाण उपाय

Garlic Tea: लसणाचा चहा प्यायल्याने तुमचा लठ्ठपणाही कमी होऊ शकतो.
Garlic Health Benefits
Garlic Health BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

तुम्हाला ऐकायला जरा विचित्र वाटत असेल, पण लसणाचा चहा देखील बनवला जातो. तो पिण्यास आरेग्यदायी असून चवीलाही चांगला असतो. लसणाचा चहा आरोग्याशी संबंधित आजारही दूर करतो. लसणामध्ये प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे ते अनेक रोगांपासून संरक्षण करते. म्हणूनच आल्याच्या चहा व्यतिरिक्त तुम्ही लसूण चहा देखील करुन पाहू शकता. 

लसणाचा चहा प्यायल्याने तुमचा लठ्ठपणाही (weight) कमी होऊ शकतो. याशिवाय हिवाळ्यात (Winter) आराम मिळतो. लसणात (Garlic) व्हिटॅमिन ए, बी1, बी2 आणि सी सर्वाधिक प्रमाणात आढळते, ज्यामुळे ते त्वचेशी संबंधित समस्यांना देखील दूर ठेवते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लसणाचा चहा हृदयविकारांसाठी (Heart) सर्वात फायदेशीर आहे, या चहामध्ये चयापचय आणि रोगप्रतिकार (Immunity) शक्ती जास्तीत जास्त आहे. जे तुमचे शरीर योग्य ठेवण्यास मदत करते. 

Garlic Health Benefits
Heart Attack: कमी वयात हार्ट अटॅक का येतो? जाणून घ्या...

लसणाचा चहा कसा बनवावा

लसणाचा चहा बनवण्यासाठी प्रथम एक कप पाणी उकळवा, नंतर त्यात चिरलेले आले आणि लसूण टाका. तुम्ही ते कमीत कमी 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर शिजवा. नंतर थंड होऊ द्या. आता ते गाळून घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घाला, आता तुमचा लसूण चहा तयार आहे. सकाळी रिकाम्या पोटी हा चहा अधिक फायदेशीर ठरेल. लसणाचा चहा रोज सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com