Ganesh Festival 2023: गणेशोत्सवात निरोगी राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दरम्यान विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला जात असला तरी आरोग्याची काळजी कशी घ्याल हे जाणून घेऊया.
Ganesh Festival 2023:
Ganesh Festival 2023:Dainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Festival Health Care Tips: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र बाजारपेठा सजावटीच्या वस्तु आणि मीठाईंनी सजल्या आहे. गणेशोत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दरम्यान विविध स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. या पदार्थांचा आस्वाद सर्वजण मोठ्या आवडीने घेतात. पण आरोग्याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. अन्यथा पोटा संबंधित आजार निर्माण होऊ शकतात.

  • घरीच बनवा मिठाई

गणेशोत्सवात अनेक लोक बाहेरचे पदार्थ खातात. पण बाहेरचे पदार्थ विकत आणल्यापेक्षा घरीच गोड पदार्थ बनवावे. घरी पदार्थ बनवतांना स्वच्छतेची काळजी घेतली जाते. यामुळे अनेक आजार देखील दूर राहतात.

  • हेल्दी स्नॅक्स

गणेशोत्सव दरम्यान आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी पोषक पदार्थामचे सेवन करावे. यामध्ये मखाना, पालेभाज्या, फळं, ड्रायफ्रुट्स यांचे सेवन करावे. यामुळे आरोग्य निरोगी ठेऊ शकता.

  • हेल्दी ड्रिंक्स

निरोगी राहण्यासाठी आणि पोटासंबंदित आजार दूर ठेवण्यासाठी तुम्ही हेल्दी ड्रिक्सचे सेवन करू शकता.यासाठी ग्रीन ज्युस, नारळ पाणी, लिंबु पाणी यासारख्या पेयांचे सेवन करू शकता. तसेच यामुळे शरीरी डिटॉक्स राहण्यास मदत मिळते.

  • तेलकट पदार्थ

जास्त तेलकट पदार्थांमुळे वजन वाढू शकते आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे गणेशोत्सवा दरम्यान जास्त तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे. तुम्ही पदार्थ भाजुण किंवा आणि मायक्रोवेव्हचा वापर करून खाऊ शकता.

Ganesh Festival 2023:
Ganesh Chaturthi 2023: लाडक्या बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी द्या 'या' खास पदार्थांचा नैवेद्य
  • मिठाई बनवतांना पौष्टिक घटकांचा वापर

जर तुम्हाला कोणतेही गोड पदार्थ आवडत असेल तर तुम्ही ते बनवण्यासाठी हेल्दी पदार्थ वापरू शकता. साखरेऐवजी, तुम्ही गूळ, मधचा वापर करू शकता. तुम्ही साध्या पिठाच्या ऐवजी भरड धान्याचे पीठ देखील वापरू शकता.

  • सॅलेड

गणेशोत्सवा दरम्यान तेलकट आणि हेव्ही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटासंबंधित आजार निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी जेवणासोबत सॅलड खाऊ शकता. भाज्या आणि फळांपासून बनवलेले सॅलड खावे. यामुळे आरोग्य निरोगी आणि फिट राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com