Ganesh Chaturthi 2023: लाडक्या बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी द्या 'या' खास पदार्थांचा नैवेद्य

Ganesh Chaturthi 2023: लाडक्या बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही खास पदार्थ बनवू शकतात.
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi 2023: दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो. यंदा १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयार सुरू झाली आहे.

दहा दिवस साजरा केला जाणार हा सण अनंत चतुर्थीला संपणार आहे. पण गणेश चतुर्थीला बाप्पासाठी तुम्ही पुढिल काही खास पदार्थ बनवू शकता. यामुळे तुमच्यावर बाप्पा प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पुर्ण करतील.

Modak
ModakDainik Gomantak

मोदक

गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहे. गणेश चतुर्थीला प्रसाद म्हणून बनवू शकता. उकळीचे मोदक, चॉकलेट मोदक, ड्रायफ्रुट्स मोदक असे विविध प्रकारचे मोदक तुम्ही बनवू शकता. यामुळे बाप्पा द्खील प्रसन्न होतील.

Shrikhand
ShrikhandDainik Gomantak

श्रीखंड

सणसुदीला श्रीखंड बनवले जाते. गणेश चतुर्थीला देखील तुम्ही श्रीखंड बनवून बाप्पाला प्रसन्न करू शकता. यासाठी दही आणि साखरेचा वापर केला जातो.

Makhana Khir
Makhana KhirDainik Gomantak

मखाणा खीर

तुम्ही गणेश चतुर्थीला मखाणा खीर बनवून बाप्पाला प्रसन्न करू शकता.यासाठी दुध आणि मखाणा लागेल. सजावीसाठी ड्रायफ्रुटचा वापर करावा.

basundi
basundiDainik Gomantak

बासुंदी

तुम्ही गणेश चतुर्थीला बासुंदी बनवून बाप्पाला प्रसन्न करू शकता. यासाठी दुधाचा वापर करावा. बासुंदीचा नैवेद्या दाखून बाप्पाला प्रसन्न करू शकता.

Puran poli
Puran poliDainik Gomantak

पुरणपोळी

गणपती बाप्पाला गोड पदार्थ आवडतात असे हिंदु धर्मामानुसार मानले जाते. पुरण पोळी गोड असल्याने तुम्ही बाप्पाला अर्पण करू शकता. या पोळीसोबत तुप किंवा दुध देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com