Ganesh Chaturthi 2023: देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यंदा १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. गणपती बाप्पा बुद्धी आणि ज्ञानाची देवता आहे. मनोभावे पुजा केल्यास बाप्पा आपल्यावर प्रसन्न होता. पण यासोबत असंही म्हटलं जातं की, श्री गणेशाच्या पूजेत आपल्याकडून काही चुका झाल्या तर आपली पूजा स्वीकारली जात नाही. तसेच त्या पूजेचे फळ मिळत नाही. त्यामुळे गणपती बाप्पाचा पुजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
तुळशीचे पान
पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा वापर गणपतीच्या पुजेत केला जात नाही. असे करणे अशुभ मानले जाते. गणपतीला नेहमी दुर्वा अर्पण करावे.
असा तांदुळ वापरू नका
तांदुळाला अक्षत असेही म्हणतात. गणपती बाप्पाची पुजा करताना अख्खा तांदुळ वापरवा. चुकूनही तुटलेला तांदुळ अर्पण करू नका. यासोबतच गणपतीच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर करणे शुभ मानले जाते.
केतकीचे फुल
गणपती बाप्पाच्या पूजेत केतकीचे फूल वापरू नका. भगवान शिवाने केतकी फुलाला शाप दिला होता. त्यामुळे गणेशजींनाही ही फुले अर्पण केली जात नाहीत.
जास्वंदाचे फुल
गणपती बाप्पाला जास्वंदाचे फुल प्रिय आहे. यामुळे बाप्पाची पुजा करताना लाल जास्वंदाचे फुल अर्पण करावे.
शिळे फुल
गणपती बाप्पाची पूजा करताना चुकूनही शिळी किंवा सुकलेली फुले अर्पण करू नका. यामुळे बाप्पा नाराज होऊ शकतात. तुमच्याकडे ताजी फुल नसेल तर फक्त दुर्वा अर्पण करू शकता. असे केल्याने घरात सुख-शांती टिकून राहते आणि नकारात्मकता दूर होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.