Ganesh Chaturthi 2021: गणपतीला "दूर्वा" का वाहता?

गणपती बाप्पाला कोवळ्या आणि हिरव्या दुर्वा अर्पण कराव्या .
Why does Ganapati love "Durva
Why does Ganapati love "DurvaDainik Gomantak
Published on
Updated on

गणपती उत्सव (Ganpati Utsav) देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. आपल्या लाडक्या बाप्पांला मोठ्या भक्ती भावात घरी आणण्यासाठी सर्व जण आतूर झाले असून, बाप्पांच्या सजावटी, प्रसादाचे पदार्थ याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. या 10 दिवसांत बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. तसेच गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात? तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी नक्की वाचा.

"Durva"
"Durva"Dainik Gomantak

गणपती बाप्पाला विघ्नहर्ता देखील म्हणतात. विघ्नहर्ता म्हणजे दुख हरणारा. गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहे. गणपती बाप्पाला आपण 21 हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या वाहतात. यात 21 दुर्वांची मिळून जुडी केली जाते. ही जुडी गणपतीच्या डोक्यावर वाहतात. यामागे अशी एक पौराणिक कथा आहे की ऋषीना आणि देवतांना अनलासुर राक्षसाने त्रास देत होता. अग्नि देवताच्या विनंतीमुळे गणपती बाप्पाने त्या असुरला गिळून टाकले. यामुळे देवतांची आणि ऋषीची त्याच्या त्रासातून मुक्ती झाली. पण गणेशच्या पोटात जळजळ होत होती. तेव्हा 88 मुनिनी प्रत्येकी 21 हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या कपाळावर ठेवल्या आणि कश्यप ऋषीनी 21 जुडी गणपती बाप्पाला खायला दिल्यानंतर पोटातील जळजळ कमी झाली. यामुळे मला दूर्वा वाहणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे गणपती बाप्पा म्हणाले होते. याचा कारणांमुळे गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात. दुर्वा ही एक औषधीयुक्त वनस्पती असून पोटातील जळजळ कमी करण्यापासून ते इतर अनेक आजारांपासून दूर ठेवते. तसेच दुर्वा खाल्ल्याने मानसिक शांतता मिळते. कर्करोगासारख्या आजारावर सुद्धा दुर्वा लाभदायी असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

Why does Ganapati love "Durva
Ganesh Chaturthi 2021: गणपती बाप्पांसोबत 'मोरया' हा शब्द का जोडला गेला...वाचा या शब्दाची कथा

* दुर्वा कशा वाहाव्यात

दुर्वा म्हणजे गवत. हे आपल्याला कुठेही मिळेल. गणपती बाप्पाला कोवळ्या आणि हिरव्या दुर्वा अर्पण कराव्या . दुर्वांच्या एका जुडीमध्ये 21 दूर्वा असतात. दुर्वा निवडतांना त्रीदल असलेले पाते घ्यावे. अनेक ठिकाणी 21 जुड्यांचा हार गणपती बाप्पाला अर्पण करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com