Ganesh Chaturthi 2021: गणपती बाप्पांसोबत 'मोरया' हा शब्द का जोडला गेला...वाचा या शब्दाची कथा

गणपती बाप्पा मोरया.. अशी जयजयकार आपण करत असतो. पण तुम्हाला त्याचा अर्थ माहित आहे का?
Ganpati Bappa Morya
Ganpati Bappa MoryaDainik Gomantak
Published on
Updated on

गणपती (Ganpati) हा संस्कृत शब्द असून, गण - पती या दोन शब्दांनी मिळून गणपती शब्द बनलेला आहे. गण शब्दाचा अर्थ लोक तर पती म्हणजे प्रभू असा होतो. म्हणून, गणपती बाप्पांला लोकांचे स्वामी म्हटले जाते. आपण "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" असे म्हणतो. पण तुम्हाला मोरया या शब्दाचा अर्थ महिती आहे का? गणपती बाप्पांसोबत मोरया (Ganpati Bappa Morya) शब्द कुठून जुळून आला यामागे 600 वर्ष जुनी कथा आहे.

Dainik Gomantak

मोरया (Morya) या शब्दाचा अर्थ मोजक्याच लोकांना माहिती असेल. महाराष्ट्रातील पुण्यापासून 18 किलोमीटर अंतरावर चिंचवड नावाचे गांव असून, ते आधी मोरया नावाने ओळखले जात होते. येथील प्रत्येकजण मोरयाबद्दल आजही जागरूक आहे. 1375 सालात जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते. त्यांचे बाप्पांप्रती समर्पण आणि भक्ति सर्वत्र पसरली होती. चिंचवडमध्ये आजही मोरया गोस्वामी त्यांच्या नावाचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते. मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे.

Ganpati Bappa Morya
Ganesh Temples In India: ही आहेत भारतातील प्रसिद्ध गणेश मंदिरे

असे सांगितले जाते की, वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात होते. परंतु वृद्धपकाळामुळे त्यांना पुढे मंदिरात जाणे शक्य होईना. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते. एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की, उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांना श्री गणेशाची एक छोटी मूर्ती मिळाली. चिंचवडमधील या मंदिरात मोरया गोसावी यांनी मूर्ती स्थापित केली. साक्षात श्री गणरायाने त्यांना दर्शन दिले. त्यावेळी मोरया गोसावींनी गणपतीकडे एक इच्छा व्यक्त केली होती की त्यांचे नाव कायम गणपती सोबत घेतले पाहिजे. बाप्पांनी देखील त्यांची ही इच्छा पूर्ण केली. मोरया गोसावी यांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी देखील येथे बांधण्यात आली. त्यामुळे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते. गणपती सोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशाप्रकारे जोडले गेले आहे की, यामुळेच आपण गणपती बाप्पांचे नाव घेताना मोरया असे म्हणतो. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया म्हणण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पांच्या नावासोबत मोरया यांचे नाव देखील जोडले गेले आहे.

Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com