G 20 मध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी दिली जातीय 'ही' खास डिश , तुम्हीही नोट करा रेसिपी

डिंकाचा हलवा भारतात होणार्‍या G-20 शिखर परिषदेत परदेशी पाहुण्यांना देण्यासाठी तयार करण्यात आला आहे
Dinkacha Halawa
Dinkacha HalawaDainik Gomantak

G 20 Special Recipe: भारतात होणाऱ्या G-20 शिखर परिषदेदरम्यान परदेशी पाहुण्यांसाठी भारतीय पदार्थांचा खास मेनू तयार करण्यात आला आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेची झलक त्यात पाहायला मिळते. परदेशी पाहुण्यांसाठी समोसा,पाणीपुरी यासारख्या अनेक पदार्थांसह डिंकाचा हलवा देखील बनवण्यात आला आहे. डिंकाचा हलवा आरोग्यासाठी फायदेशीर असतो. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवतात डिंकाचा हलवा.

  • डिंकाचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

खाण्याचा डिंक - 1/4 कप

देशी तूप - 1/2कप

गव्हाचे पीठ - 1 कप

साखर किंवा गूळ - 3/4कप

पाणी - 2 वाट्या

बदाम- बारीक चिरून

काजू- बारीक चिरून

पिस्ता- बारीक चिरून

विलायची पावडर -1/2 टीस्पून

Dinkacha Halawa
Astrology Tips: 'या' लोकांनी सोन घालू नये,अन्यथा...
  • कसा बनवावा डिंकाचा हलवा

कढईत थोडं तूप गरम करून त्यात डिंक टाकावे आणि फुगून सोनेरी होईपर्यंत तळावे. आता ते वेगळ्या प्लेटमध्ये काढावे.आता कढईत तूप घालून त्यात गव्हाचे पीठ मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावेनंतर एका पॅनमध्ये पाणी आणि साखर किंवा गूळ घालून ते घट्ट होईपर्यंत शिजवा. नंतर आता पिठातमध्ये भाजलेला डिंक, विलायची पावडर आणि साखरेचा पाक मिक्स करावा. घट्ट होईपर्यंत चांगले शिजवावे. तयार हलवा सर्व्ह करण्यापूर्वी बारीक चिरलेले बदाम, काजू आणि पिस्ते घालून सजवावे. तुमचा डिंकाचा हलवा तयार आहे, गरमागरम सर्व्ह करा आणि आस्वाद घ्या.

  • डिंक हलव्याचे फायदे

डिंक हलवा भारतीय घरांमध्ये हिवाळ्यात बनवला जातो. कारण त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हिवाळ्यात सांधे आणि स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो. डिंकाचा हलवा ऊर्जा प्रदान करतो ज्यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार आणि सक्रिय राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले फायदेशीर घटक शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात. तसेच रोगांशी लढण्यास मदत करतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com