Raw Vegetables: मशरूमसह 'या' 3 भाज्या चुकूनही खाऊ नका कच्च्या

Healthy Tips: काही भाज्या भाज्या खाण्यापूर्वी वाफवून घेणे आवश्यक आहे.
Raw Vegetables
Raw VegetablesDainik Gomantak
Published on
Updated on

अनेक कच्च्या भाज्या कोशिंबीर म्हणून खाल्ल्या जातात. काकडी, टोमॅटो, कोबी यांसारख्या भाज्यांचा सॅलडमध्ये भरपूर पोषक असतात. पण काही भाज्या अशा असतात ज्या चुकूनही कच्च्या खाऊ नयेत. यामुळे आरोग्य (Health) धोक्यात येऊ शकते. भाज्या कच्च्या असल्यामुळे त्यात असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा पुरेपूर फायदा मिळत नाही. या भाज्या नेहमी उकळून, वाफवून किंवा भाजून खाव्यात. यामुळे आरोग्यास कोणताही धोका होणार नाही. (Raw Vegetables news)

* वांग (Aubergine)

कच्ची वांगी खाल्ल्यास त्याचा पचनसंस्थेवर (Digestive System) परिणाम होतो. वांगी कच्ची खाल्ल्याने उलट्या आणि पोटदुखी होऊ शकते. वांग्यातील सोलॅनिनमुळे न्यूरोलॉजिकल आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांची लक्षणे उद्भवू शकतात. जेव्हाही वांगी खावीत तेव्हा ती चांगली शिजवावी.

Aubergine
AubergineDainik Gomantak
Raw Vegetables
Feng Shui: फेंगशुईचे 'हे' 3 उपाय करतील धनाची कमतरती दूर

* मशरूम (Mushroom)

मशरूम नेहमी शिजवा खावे. कारण शिजवून खाल्ल्याने तुम्हाला त्यातील सर्व पोषक तत्वे मिळतील. मशरूम ग्रील करून किंवा उकळून खा. ग्रिलिंग केल्याने मशरूममधील पोटॅशियमचे प्रमाण वाढते.

mushroom
mushroom Dainik Gomantak

* बटाटा (Potato)

कच्च्या बटाट्यामध्ये सोलॅनिन नावाचे विष असते. कच्चे खाल्ल्याने गॅस, उलट्या आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात. बटाटे उकडलेले किंवा तळलेले खा.

Potato
PotatoDainik Gomantak

* पालक (Spinach)

पालकामध्ये फोलेट असते. ते कधीही कच्चे खाऊ नका, नेहमी वाफवून, उकळून किंवा चांगले शिजवून खावे. हे फोलेटची पातळी संतुलित करण्यास मदत करते.

Spinach
SpinachDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com