निरोगी राहणे हे आजकाल प्रत्येकाचे मुख्य ध्येय आहे. रोग्यापेक्षा काहीही महत्वाचे नाही याची जाणीव कोरोनाने (Corona) सर्वांना करून दिली आहे. सर्वात महत्वाचे गोष्ट म्हणजे निरोगी राहणे आणि निरोगी (Healthy) राहण्यासाठी सकस आहाराचे सेवन करणे. तसेच सध्याच्या काळात निरोगी राहण्यासाठी आहाराबरोबरच योगा (Yoga) करणे महत्वाचे आहे. आपली पचन संस्था (Digestion) सुरळीतपणे कार्य करत असेल तर आपले आरोग्य देखील निरोगी राहून अनेक आजार दूर राहतात. (Tips for Better Digestive Health)
* शांतपणे जेवण करावे
जेवण करतांना नेहमी शांततेत जेवण करावे. टीव्ही (टीव्ही) पाहत, मोबाइल (Mobile) किंवा लॅपटॉप (Laptop) पाहत जेवण करणे टाळावे. जेवण करतांना नेहमी अन्नावर लक्ष देवून करावे. यामुळे तुमची पचन संस्था चांगली राहते.
* पदार्थांचे सेवन सावकाश करावे.
कुठलाही पदार्थाचे सेवन करतांना नीट चावून खावे. अन्नाचे नीट चावून सेवन केल्याने अन्न लवकर पचते. यामुळे आपली पचन संस्था (Digestive System) देखील सुरळीत कार्य करते. यामुळे घाईमध्ये जेवण करणे टाळावे.
* पाय फोल्ड करून बसावे
पचन संस्था सुरळीत राहण्यासाठी जेवणानंतर पाय फोल्ड करून बसावे. विशेष म्हणजे जमिनीवर बसून कारंबे अधिक फायदेशीर असते. यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न पचण्यास मदत मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.