Fitness Tips: बसल्याजागी करा 'हे' व्यायाम, खांदे,पाठदुखीपासून मिळेल आराम

ऑफिसमध्ये बसून एकसारखे काम केल्यामुळे अनेकवेळा पाठ,खांदेदुखीची समस्या वाढते.
Fitness Tips
Fitness TipsDainik Gomantak
Published on
Updated on

fitness tips office work desk yoga avoid backpain

जर तुम्ही ऑफिसमध्ये बराच वेळ एकाच जागी बसून काम करत असाल तर पाठ, मान, खांदे आणि हात दुखणे आणि अकडणे यासारख्या समस्या खूप सामान्य निर्माण होऊ शकतात. रोज काही व्यायाम करून तुम्ही या समस्या कमी करू शकता. पण वेळेअभावी काही लोकांना इच्छा असूनही व्यायाम करता येत नाही. कारण कामामुळे पुरेसा वेळ मिळत नाही. पण तुम्ही तुमच्या डेस्कवर बसून पुढील योगा कोल्यास सर्व समस्या कमी होऊ शकतात.

बसल्याजागी कसा करावा योगा

खुर्चीवर सरळ बसा आणि आपले मनगट डेस्कवर ठेवा. नंतर बोटे हळू हळू उघडा आणि बंद करा. असे 10-15 वेळा करा.

दोन्ही हात घट्ट बंद करा आणि मुठी समोरच्या दिशेने ठेवा. दोन्ही मनगट आधी उजवीकडे पाच वेळा आणि नंतर डावीकडे पाच वेळा फिरवा. असे केल्याने कॉम्पुटरवर बराच वेळ काम केल्याने होणार त्रास कमी होईल.

तुमचा उजवा हात विरुद्ध खांद्यावर आणि विरुद्ध हात सरळ खांद्यावर ठेवा. दिर्घ श्वास घ्यावा. एक मिनिट असेच राहावे. हळूहळू सामान्य स्थितीत परत या. एकाच ठिकाणी बसल्याने होणारी पाठदुखी कमी होते.

बसताना जर तुमचे पाय सुन्न होत असतील तर त्यासाठी तुमची टाच जमिनीवरून उचला आणि हळूहळू जमिनीवर ठेवा.

खुर्चीच्या कधीही समोरच्या भागावर बसू नका. बसण्याची पद्धत योग्य असली पाहिजे. यानंतर, एक पाय सरळ करा. सुमारे 20 सेकंद असेच आपले पाय वर करत रहा. असेच दुसऱ्या पायाने पुन्हा करा. पाय दुखण्यासाठी हा एक चांगला व्यायाम आहे.

एकाच जागी सरळ उभे रहा. आपल्या तळहातांनी डेस्क पकडा. टाच किंचित वर करा आणि बोटांच्या पुढील भागावर उभे रहा. 10 सेकंद असेच धरून ठेवा. असे पाच सहा वेळा करा. तुम्हाला रिलॅक्स वाटेल.

मानेच्या मागच्या भागात होणारी वेदना कमी करण्यासाठी सरळ बसा. मान एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे फिरवा. प्रत्येक बाजूला किमान 10-15 सेकंद धरून ठेवा. यानंतर, मान गोलाकार दिशेने फिरवा.

खुर्चीवर बसल्या बसल्या तुम्ही खाद्यांचा व्यायाम करू शकता. खांदे हळूहळू गोलाकार फिरवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com