कोणत्या देशाचे रहिवासी सर्वात आनंदी? भारत कोणत्या स्थानी?

अफगाणिस्तान 146 व्या क्रमांकावर आहे.
Finland
Finland Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

अमेरिका, ब्रिटन आणि रशियासारख्या विकसित देशांना मागे टाकत फिनलँड पुन्हा एकदा जगातील सर्वात आनंदी देश म्हणून पुढे आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 10व्या जागतिक आनंद अहवालात फिनलँडला जगातील सर्वात आनंदी देश म्हणून स्थान देण्यात आले आहे. फिनलँडने सलग पाचव्यांदा हा पराक्रम केला आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील सद्यस्थिती पाहता फिनलँड हे युरोपीय देशांसाठी उदाहरण बनले आहे. भारत 136 व्या स्थानावर आहे.

Finland
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा 'काऊंटडाऊन' सुरू?

जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत फिनलँड (Finland) नंतर टॉप-5 देशांमध्ये डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँडची नावे आहेत. याशिवाय लक्झेंबर्ग, स्वीडन, नॉर्वे आणि न्यूझीलंडनेही टॉप-10 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. 'वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट'मध्ये जगभरातील देशांच्या आनंदाचा तीन विशेष 'पॅरामीटर्सवर' अंदाज लावला आहे. त्यात जीवनाचे मूल्यमापन, सकारात्मक भावना आणि नकारात्मक भावना यांचा समावेश होतो.

Finland
दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानात धूर; पाकिस्तानमध्ये केले आपत्कालीन 'लॅंडींग'

टॉप-10 देशांनंतर यादीत ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया (Australia), आयर्लंड, जर्मनी आणि कॅनडाच्या (Canada) नावांचा समावेश आहे. तर अमेरिकेने 19व्या स्थानावरून 16व्या स्थानावर झेप घेतली आहे. याशिवाय ब्रिटन 17व्या, झेकिया 18व्या, बेल्जियम 19व्या आणि फ्रान्स 20व्या स्थानावर आहे. भारत गतवर्षी 139 व्या क्रमांकावर होता आणि यावेळी 136 व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तान 146 व्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com