Figs Benefits: रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अंजीर ठरते फायदेशीर...

अंजीर हृदयाला मजबूत करते तर अंजीरच्या पानांनी रक्तातील साखर नियंत्रित केली जाऊ शकते. हिवाळ्यात अंजीर खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
Figs Benefits
Figs BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

अंजीरमध्ये प्रथिने, आहारातील फायबर, फोलेट, नियासिन, झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, रिबोफ्लेविन यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. अंजीर खाण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. म्हणूनच अंजीर ही निसर्गाची अनमोल देणगी मानली जाते. अंजीर शरीराच्या प्रत्येक भागाला फायदेशीर ठरते. अंजीराच्या सेवनाने पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

(Figs Benefits)

Figs Benefits
Breakfast Recipe: ब्रेकफास्टमध्ये स्टफ्ड ओट्स चीलाचा घ्या आस्वाद

अंजीर खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे भूक कमी होते आणि शेवटी वजन वाढत नाही. अंजीर हृदय मजबूत करते. याशिवाय अंजीरच्या पानांनी मधुमेहावर उपचार केले जातात. अंजीरमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आढळतात, विशेषत: पॉलीफेनॉल जे हृदयाचे रक्षण करण्यासाठी ओळखले जाते. पॉलीफेनॉल ऑक्सिजनला इतर रसायनांशी प्रतिक्रिया करण्यापासून संरक्षण करते. म्हणजेच ते ऑक्सिडेशन व्यवस्थापित करते.

अंजीरचे फायदे

पचनशक्ती बळकट करते- पचनशक्तीतील अडथळे दूर करण्यासाठी अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो. हे लहान आतड्याचे पोषण आणि टोन करते. हे पोटात नैसर्गिक रेचक म्हणून काम करते कारण त्यात भरपूर फायबर असते. यात प्रीबायोटिक गुणधर्म देखील आहेत ज्यामुळे ते चांगले बॅक्टेरिया वाढवते.

हाडे मजबूत करते - कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी हाडे मजबूत करणारी अनेक खनिजे अंजीरमध्ये आढळतात. अंजीरमध्ये पोटॅशियम असल्यामुळे ते मूत्रातून कॅल्शियमचे उत्सर्जन रोखते. यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.

Figs Benefits
Swasthyam 2022 : मानसिक-शारीरिक आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त? जाणून घ्या योगसाधनेचे फायदे

हृदयाला निरोगी बनवते - अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की अंजीर रक्तातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते. अंजीरमध्ये विरघळणारे-फायबर पेक्टिन असते, जे शरीरातील रक्तामध्ये जमा झालेले कोलेस्टेरॉल काढून टाकते. याव्यतिरिक्त, अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम समृद्ध, सुके अंजीर रक्तदाब नियंत्रित करते. हे शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून टाकते. तसेच, हे रक्तवाहिन्यांमधील अडथळा टाळते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.

ग्लुकोजचे संतुलन - अंजीराच्या पानांचा चहा प्यायल्यास टाइप 1 मधुमेह नियंत्रणात राहतो. हे रक्तातील साखरेची पातळी कमी करते. अंजीराची पाने खाल्ल्यानंतर रक्तातील साखर कमी होते. मात्र, वाळलेल्या अंजीरमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे फक्त रक्तातील साखर वाढते.

वजन कमी ठेवते - ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी अंजीर उत्तम स्नॅक्स आहे. वाळलेल्या अंजीरमध्ये असलेले विरघळणारे फायबर भूक कमी करते, ज्यामुळे वजन कमी होते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जास्त फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होते. मात्र अंजीर मर्यादित प्रमाणात रोज खावे. दिवसातून २-३ पेक्षा जास्त अंजीर खाऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com