Feng Shui Tips: घराच्या 'या' दिशेला वॉटर फाउंटेन ठेवल्यास मिळेल सुख-शांती

फेंगशुईमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत ज्यामुळे अनेक समस्या दूर होऊन जीवनात आनंद आणि सुख-शांती येते.
Feng Shui Tips
Feng Shui TipsDainik Gomantak

Feng Shui Tips For Water Fountain: वास्तुशास्त्राप्रमाणेच फेंगशुईवास्तुमध्ये देखील घरातील सुख-शांतीसाठी उपाय सांगितले आहेत. फेंगशुईनुसार घरात वॉटर फाउंटेन असणे शुभ मानले जाते. पण वॉटर फाउंटेन संदर्भात काही नियम सांगितलेले आहेत. घराच्या कोणत्या दिशेला वॉटर फाउंटेन असणे शुभ मानले जाते हे जाणून घेऊया.

  • घरात वॉटर फाउंटेन असणे मानले जाते शुभ

फेंगशुईनुसार घरात वॉटरफॉल किंवा वॉटर फाउंटेन असावे. कारण फेंगशुईनुसार शुभ मानले जाते. पण त्या वॉटरफॉल किंवा वॉटर फाउंटेनमध्ये पाणी वाहते असावे.

  • सकारात्मकता राहते

फेंगशुईनुसार घरात वॉटर फाउंटेन असेल तर नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा कायम राहते. यामुळे घरात जर सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवायची असेल तर तुम्ही घरात वॉटर फाउंटेन ठेऊ शकता.

  • करिअरमध्ये यश

फेंगशुईनुसार घरामध्ये वॉटरफॉल किंवा वॉटर फाउंटेन ठेवल्याने कुटूंबातील सदस्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश प्राप्त होते. तसेच मन शांत ठेवण्यास मदत मिळते.

  • अपुर्ण काम

फेंगशुईनुसार घरात वॉटर फाउंटेन असेल तर अपुर्ण काम लवकर पुर्ण होण्यास मदत मिळते. यामुळे घरात वॉटर फाउंटेन असावे.

Feng Shui Tips
Weak Bones: हाडं कमकुवत होण्याची आहेत 'ही' 7 लक्षणं, वेळीच घ्या काळजी
Water Fountain
Water FountainDainik Gomantak
  • सुख-शांती

फेंगशुईनुसार घरात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर वॉटर फाउंटेन ठेवणे शुभ मानले जाते. तुम्हालाही घरात सुख-शांती हवी असेल तर तुम्ही घरात छोटेसे वॉटर फाउंटेन ठेऊ शकता.

  • आरोग्य

फेंगशुईनुसार घरात वॉटर फाउंटेन ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. यामुळे कोणीही घरात आजारी पडत नाही.

घराच्या कोणत्या दिशेला असावे वॉटर फाउंटेन

  • उत्तर-पूर्व दिशा

फेंगशुईनुसार वॉटर फाउंटेन घराच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. यामुळे घरात वॉटर फाउंटेन ठेवतांना दिशेला महत्व द्यावे.

  • पाणी वाहते असावे

घरात वॉटर फाउंटेन ठेवल्यानंतर त्यात नेहमी पाणी वाहते असावे. फेंगशुईनुसार वॉटर फाउंटेनमध्ये वाहते पाणी नसल्यास आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.

  • बंद वॉटर फाउंटेन

घरात कधीच बंद वॉटर फाउंटेन ठेऊ नका. कारण फेंगशुईनुसार घरात बंद वॉटर फाउंटेन ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागु शकते.

  • वॉटर फाउंटनची जागा

फेंगशुईनुसार घराच्या मुख्य गेटवर वॉटर फाउंटेन लावणे शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. घराच्या अंगणातही वॉटर फाउंटेन लावणे शुभ मानले जाते. 

  • फोटो

जर घरात वॉटर फाउंटेन ठेवायला जागा नसेल तर ठेवू त्याचा फोटो घरात ठेऊ शकता. फेंगशुईनुसार घरात वॉटर फाउंटेनचा फोटो ठेवणे देखील शुभ मानले जाते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com